HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसे बॉम्बे रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर!

मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर नसल्याने ते सध्या रुग्णालयात दाखल आहेत. गेल्या आठवडाभरापासून ते बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत आहेत. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सध्या एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहे. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै महिन्यात ईडीने ताब्यात घेतले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. तर एकनाथ खडसे हेदेखील ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे गेले होते.

माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन

एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांवर ईडीची टांगती तलवार आहे. माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी दिला होता. त्यामुळे ईडीची चौकशी लागल्यानंतर एकनाथ खडसे काय करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केली होती.

तब्बल ९ तास कसून चौकशी

एकनाथ खडसे यांची ईडीने तब्बल ९ तास कसून चौकशी केली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे ईडीला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. चौकशीवेळी आम्ही सर्व प्रकारचं सहकार्य दिलंय. या चौकशीत संपत्तीची संपूर्ण चौकशी करण्यात आलीय. ईडीने स्टेटमेंट्सची सत्यता तपासलीय. याशिवाय ईडीला जे कागदपत्रे हवी होती ती सगळी दिलीत. ईडीला आणखी काही कागदपत्रे हवी होती ती कागदपत्रे १० दिवसात जमा करण्यास सांगितलं आहे. ईडीला जेव्हा चौकशीसाठी आमची गरज लागेल तेव्हा तेव्हा आम्ही यायला तयार आहोत, असे एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी म्हटले होते.

काय आहे प्रकरण?

भोसरी येथील एमआयडीसी भूखंड घोटाळाप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी, यांच्यासह इतरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. खडसे यांच्यावर पदाचा दुरुपयोग करून हा जमीन व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर, ही जमीन शारदा खडसे यांच्या नावावर असून आर्थिक व्यवहाराबद्दलही त्यांच्यावर आरोप आहेत.

भाजपला रामराम करत एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आले होते. यानंतर ईडीने भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी एकनाथ खडसे यांना नोटीस बजावली. पुढे ईडीने तपास सुरू ठेवला. ईडीने खडसे यांचे जावई चौधरी यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावले होते. रात्री उशिरापर्यंत चौधरी यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडी सरकारने बीडला केवळ वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत,पंकजा मुंडेंचा आरोप

Arati More

जवळपास १६ तासांनी बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला वाचविण्यात यश

News Desk

शिवसेनेची कोंडी करत राज्यात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन

News Desk