HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसे आणि नारायण राणे यांची केंद्रात वर्णी

नवी दिल्ली | नारायण राणे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष्याची स्थापना केली. त्यानंतर ते एनडीएत सामील झाले. राणे हे गेल्या अनेक दिवसापासून राज्याच्या राजकारणात सक्रीय होण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत. यासाठी राणेंनी दिल्लीत जावून भाजपचे अध्यक्ष आमित शहा यांची भेट देखील घेतली. या भेटीनंतर राणेंना केंद्रात पाठविण्यात येणार असल्याचे चर्चाला उधान आले आहे.

तसेच गैरव्यवहाराच्या आरोपामुळे एकनाथ खडसे यांना महसूलमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर खडसे सुद्धा राजकारणापासून काही काळ लांब राहिले होते. पण, पक्ष्याकडून त्यांना केंद्रात पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

येत्या २३ मार्चला राज्यसभेच्या ५८ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात राज्यसभेसाठी ६ जागावर निवडणुका होणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातून भाजपचे ३ उमेदवार राज्यसभेत पाठवण्यात येणार आहे. भाजपच्या वतीने दोन जांगेवर नारायण राणे आणि एकनाथ खडसे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाला असल्याचे कळत आहे. आता एका जाग्यांवर भाजपमधील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राहुल कलाटे चिंचवड पोटनिवडणूक लढवणार; ‘मविआ’च्या प्रयत्नांना अपयश

Aprna

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन नंबर

News Desk

सचिन वाझेंचें सहकारी रियाज काझी यांना NIAकडून अटक

News Desk
महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला राज ठाकरेंचा ही पाठिंबा

News Desk

मुंबई | शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, कर्जामाफी, शेतकरी आत्महत्या, गारपीट आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती या सर्व मागण्या मान्य होण्यासाठी हा लाँग मार्च मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मोर्चाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांनी स्वत: किसान सभेचे सचिव अजित नवले यांना फोन केला.

हा लाँग मार्च मोर्चा मुंबईत आल्यानंतर मनसैनिक देखील सहभागी झाले आहेत. मनसैनिकांनी या लाँग मार्च मोर्चाचे स्वागत केले आहे. या लाँग मार्च मोर्चाला आम आदमी पार्टीने पाठिंबा दिला आहे. आप सुद्धा शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सरकार विरोधात लढणार आहे. हा मोर्चा नाशिकमधून निघालेला आहे. येत्या १२ मार्चला मुंबईला विधान भवनात धडकणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी सहभागी नोंदवली आहे.

या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी सरकार विरोधात ‘नरेंद्र मोदी किसान विरोधी’ असे फलक हाता घेऊन शेतकरी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. हा मोर्चा शनिवारी ठाण्याजवळील भिवंडी इथे पोहोचला आहे. भाजप सरकारने सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने दिली होती. सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपला त्यांच्या आश्वसनाचा विसर पडला आहे. राज्य सरकारने गारपिटी ग्रस्त शेतकऱ्यांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई दिली नाही. या लाँग मार्चमध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शेतकरी यात सामील झाली आहे.

Related posts

‘स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण…’, नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

News Desk

संविधानाच्या संरक्षणासाठी संघटित होणे गरजेचे! – यशोमती ठाकूर

Aprna

कोरेगाव-भीमा प्रकरणी आयोगासमोर शरद पवारांची साक्ष नोंदवण्यास सुरुवात

Aprna