HW News Marathi
महाराष्ट्र

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन नंबर

मुंबई | कोरोना साथरोग नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली आहे. जनतेने रेशनिंग संदर्भातील तक्रारी आणि माहिती मिळविण्यासाठी 1800224950 किंवा 1967 या नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.

लॉकडाऊन कालावधीत शिधावस्तू उपलब्धतेचे सनियंत्रण करताना रेशनिंग हेल्पलाईन बाबतीत जनतेत जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे. रेशनिंग साठीच्या तक्रारीसाठी/रेशनिंगची माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करा किंवा ईमेल वा ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करून आपली तक्रार नोंदवा, असे आवाहन जनतेस करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय हेल्पलाईन ही सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार असून त्याचा हेल्पलाईन क्रमांक : 1800 22 4950/1967 (नि:शुल्क) आहे.

अन्य हेल्पलाईन क्रमांक : 022- 23720582 / 23722970 / 23722483, ईमेलhelpline.mhpds@gov.in, ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी mahafood.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली याचा वापर करा. तसेच मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले असून हा कक्ष सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहील. त्याचा हेल्पलाईन क्रमांक- 022-22852814,ईमेल- dycor.ho.mum@gov.in असा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदुरीकर महाराजांना न्यायालयाकडून तूर्तास दिलासा, २० ऑगस्टला पुन्हा हजर राहावे लागणार

News Desk

…शपथ देऊनही कार्यकर्ते थांबतील का ?, मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला टोला

News Desk

INS विक्रांतमध्ये एका दमडीचाही घोटाळा केलेला नाही! – किरीट सोमय्या

Aprna