HW News Marathi
महाराष्ट्र

भोसरी प्रकरणात एकनाथ खडसेंना दिलासा, २५ जानेवारीपर्यंत सुनावणी तहकूब

मुंबई | भाजपतून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भोसरी भूखंड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. ईडी याप्रकरणी येत्या सोमवारपर्यंत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, असे ईडीने मुंबई उच्च न्यायालयाला आज (२१ जानेवारी) सांगितले आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत याप्रकरणी सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी घेतली जाणार आहे

एकनाथ खडसे हे तपासात सहकार्य करत असतील आणि चौकशीच्या समन्सचे पालन करत असतील तर त्यांना अंतरिम दिलासा का देऊ नये? त्यांना काही दिवसांसाठी संरक्षण दिलं तर आभाळ कोसळणार आहे का? असा सवाल न्या. संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ईडीला केला आहे. त्यानंतर ईडीनं सोमवारपर्यंत कुठलीही कठोर कारवाई न करण्याची हमी दिली आहे. या हमीची न्यायालयानं नोंद घेतली आहे. खडसे यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांची १५ जानेवारीला ईडीकडून चौकशी केली गेली होती. जवळपास ६ तास ही चौकशी करण्यात आली होती. भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यानंतर खडसेंना कोरोनाची लागण झाल्याने ते क्वारंटाईन झाले होते. यानंतर खडसेंनी ईडीकडून काही दिवसांचा वाढीव कालावधी मागितला होता. त्यानंतर आता खडसे १५ जानेवारीच्या वेळ कार्यालयात हजर राहण्यासाठी देण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर उद्या माझी पुन्हा ब्रेकिंग न्युज होईल!”, अजित पवारांचा पत्रकारांना मिश्किल टोमणा

News Desk

अशोक चव्हाणांशी संबंधित साखर कारखाने आयकर विभागाच्या रडारवर

News Desk

उद्धव ठाकरे उद्या घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

News Desk