HW News Marathi
महाराष्ट्र

भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून दिलासा

मुंबई | भोसरी जमीन प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. आजची सुनावणी काही कारणानं होऊ न शकल्यानं पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम आहे. भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसे यांना सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीने नोटीस बजावली होती. या प्रकरणी ईडीच्या कारवाईविरोधात खडसेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी काही कारणानं होऊ न शकल्यानं पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम आहे.

८ मार्चपर्यंत हायकोर्टाकडून खडसे यांना दिलासा देण्यात आला आहे.भाजपला रामराम करत एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर ३० डिसेंबरला एकनाथ खडसे यांना चौकशीला हजर राहायचे होते. ते ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. परंतु, कोरोनाची लागण झाल्यानंतर अखेरीस १५ जानेवारीला ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन वाझे आणि शिवसेनेतील संबंधांवर संजय राऊत म्हणाले….! 

News Desk

वारकरी चिडले, उध्दव ठाकरे आणि अजित पवारांनी आता परिणाम भोगायला तयार राहा!

News Desk

मुंबईतल्या नायर रुग्णालयात लसीकरणाच्या क्लिनिकल ट्रायलसाठी मुलेच मिळणं कठीण!

News Desk