HW News Marathi
महाराष्ट्र

नाथाभाऊंना राजकारण नीट समजतं –  देवेंद्र फडणवीस

जळगाव | गेले काही दिवस भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज असून पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तसेच, एकनाथ खडसेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले होते. मात्र, आता फडणवीसांनीच नाथाभाऊंना राजकारण नीट समजतं, असे म्हटले आहे. ते योग्य निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे, असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

काल (१२ ऑक्टोबर) जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्यामुळे उभारण्यात आलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पणासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी फडणवीस बोलत होते. माझी नाथाभाऊंशी कुठलीही चर्चा झालेली नाही. पण, योग्यवेळी चर्चा मी करेन. मला वाटतं ते योग्य निर्णय घेतील, असं फडणवीस म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भल्या पहाटेही झालाच होता मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न”,राऊतांचा अजित पवारांना चिमटा

News Desk

कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूकीत भाजपच्या अतुल भोसलेंचा विजय!

News Desk

राज्य सरकारची इच्छा नसल्यामुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही! – प्रीतम मुंडे

Aprna