HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसे आणि फडणवीसांमध्येही बोलणं झालं, रक्षा खडसेंनी दिली माहिती

जळगाव | राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गेले अनेक दिली दौऱ्यावर आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काही दिवस ते दौरे करत आहेत. अशात त्यांनी थेट जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने लोकांच्या भुवय्या उंचावल्या. भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी फडणवीस गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. खडसेंनी भाजप सोडतानाही फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे फडणवीसांच्या या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान यासंबंधी खडसेंच्या सून आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनी एबीपी माझाशी बोलताना भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीसंबंधी बोलताना रक्षा खडसे यांनी सांगितलं की, “फडणवीस पहिल्यांदाच घरी आले असं नाही, याआधीही ते अनेकदा आमच्या घऱी येऊन गेले आहेत. राजकारण राजकारणाच्या जागी आहे आणि दुसरीकडे आमचे संबंध चांगले आहेत. एकनाथ खडसे यांचंही त्यांच्याशी बोलणं झालं. भाजपची खासदार असताना नेते आल्यानंतर त्यांना घरी बोलावणं आणि चहा पाण्यासाठी विचारणं माझं कर्तव्य आहे”, असं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.

“आम्ही सर्व आमदार, पदाधिकारी, नेत्यांसोबत शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या शंका फडणवीसांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. मागील आठ दिवसांत पाऊस, वारा यामुळे केळीचं मोठं नुकसान झालं आहे. केळीच्या बागा झोपल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हातातील माल गेला आहे. पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न ते नक्कीच विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

रक्षा खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का ? असं विचारण्यात आलं असता सांगितलं की, “अशा चर्चा खूप होत असतात, पण जोपर्यंत मी काही अधिकृत सांगत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही”. पक्षाने जबाबदारी दिली तर पुढील निवडणूकही भाजपकडूनच लढणार असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे रक्षा खडसे यांनी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात काल बोलणं झालं तर ते कशाबद्दल झालं? काय झालं हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

करण जोहरच्या पार्टीची चौकशी फडणवीस सरकार असतानाच का नाही केली !- सचिन सावंत

News Desk

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा, NDRF पथकांना सज्ज ठेवा! – मुख्यमंत्री

Aprna

शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे सरकारचे आवाहन!

News Desk