HW News Marathi
महाराष्ट्र

फाशी घेण्याची वेळ आणेपर्यंत एका माणसाने छळलं… एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

जळगाव | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान, भाजपमध्ये त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी खूप छळ केल्याचे खडसे यांनी सांगितले होते. आता खडसे यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपमधल्या एका व्यक्तीने मला छळलं अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे. आता फक्त दोनच पक्ष राहिले. यापुढे महाविकासआघाडी आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार अशी गर्जनाही एकनाथ खडसेंनी केली. ते जळगावच्या मुक्ताईनगर इथं बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.

‘मला अक्कल शिकायला चालले होते. मी अख्खं आयुष्य भारतीय जनता पार्टीला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसाने छेळलं.’ असं म्हणत खडसेंनी देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला आहे. मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिलं. गल्लीतले कार्यकर्ते मी मोठे केले आणि आता तेच मला अक्कल शिकवायला लागले असंही म्हणत खडसेंनी भाजपवर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेडमध्ये वीज पडून शेतकरी जखमी, एक म्हैस व गायीचे वासरु ठार

News Desk

धर्मा प्रोडक्शनच्या क्षितीज प्रसाद यांना एनसीबीकडून अटक

News Desk

मराठा आरक्षण सुनावणीच्या पूर्वतयारीचा मंत्रीमंडळ उपसमितीने घेतला आढावा

News Desk