HW News Marathi
महाराष्ट्र

प्रेयसीच्या नातेवाईकांकडून प्रियकराचा विष पाजून खून 

चौघांविरोधात गुन्हा दाखल, तिघांना अटक, एक जण फरार

उत्तम बाबळे

नांदेड – नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाणे क्षेत्रांतर्गत असलेल्या मौ.सोमठाणा येथील एका 22 वर्षीय प्रियकरास एकांतात बोलण्याचे बहाण्याने प्रेयसीच्या नातेवाईकांनी विषारी औषध पाजले. उपचारा दरम्यान प्रियकराचा मृत्यू झाल्यानं प्रेयसीच्या चार नातेवाईकांविरोधात कुंटूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून दोन जण फरार आहेत.

मौ.सोमठाणा ता.नायगाव येथील परमेश्वर मधुकर शिंदे (२२) या तरुणाचे गावातील एका तरुणीशी प्रेमाचे सुत जुळले होते. यामुळेच त्या प्रेयसीचे तिच्या नातेवाईकांनी अन्य एका तरुणासोबत लग्न लाऊन दिले होते. परंतू या विवाहित प्रेयसी सोबत त्याचा संपर्क चालूच होता. या संबंधांमुळं तिचा संसार तुटू नये म्हणून परमेश्वरला एकांतात चर्चेसाठी बोलावलं. १ जून २०१७ रोजी दिवसभर शेतात काम करुन मित्रासोबत घरी परत येत असलेल्या परमेश्वरला सायंकाळी दिगांबर सदबा सावळे, सुशिलाबाई सावळे, माधव जाधव, अनंत उर्फ आनंदराव जाधव या तिच्या नातेवाईकांनी गाठले व बोलण्याच्या बहाण्याने त्यास डॉ. भगवान कवळे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली नेले व तू आमच्या मुलीला आता यापुढे बोलू नको अशी तंबी देत त्यास या सर्वांनी तृण नाषक विषारी औषध जबरदस्तीने पाजले आणि घटनास्थळावरुन पळ काढला. ही बाब परमेश्वर शिंदेच्या नातेवाईकांनी कळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठले व त्याला उपचारासाठी नायगाव येथे नेले.

अधिक विष प्राषण झाल्यामुळे त्यास पुढील उपचारार्थ नांदेड येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या घटनेविषयी कुंटूर पोलीसांत प्रथम जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. शासकिय रुग्णालय नांदेड येथे उपचार सुरु असतांना २ जून २०१७ रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे मयत परमेश्वर शिंदे यांचा भाऊ दौलत मधुकर शिंदे (२०) यांनी कुंटूर पोलीसांत उपरोक्त चार जणांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून प्रथम दाखल केलेल्या गुन्ह्यात वाढ करुन खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सहाय्यक पो.नि.विवेकानंद पाटील,सहाय्यक पो.उप.नि.भोळे,जमादर अशोक दामोदर सांगवीकर, बालाजी राठोड यांनी दिगांबर सदबा सावळे व आनंदा गोविंद जाधव,दोघे रा.सोमठाणा यांना अटक केली तर अन्य दोघे फरार होण्यात यशस्वी झाले.अटक केलेल्या या दोघांना २ जून रोजी दुपारी न्यालयात कुंटूर पोलीसांनी हजर केले असता न्यायाधिशांनी त्यांना ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास विवेकानंद पाटील हे करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC Election 2022: 53 ओबीसींसाठी आरक्षित वॉर्ड कोणते?, शिवसेनेच्या दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित

Manasi Devkar

रिसोड येथे आमदार निलंबनाच्या निषेधार्थ मोर्चा

News Desk

प्रभाकर साहिलच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता; सीआयडी चौकशी करा! – महेश तपासे

Aprna