HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही EDचं समन्स, खडसे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत असंच दिसून येतं आहे. खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं त्यापाठोपाठ आता एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे एकूणच खडसे कुटुंबाच्या अडचणीच वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.

पुण्यातील भोसरी या ठिकाणी असलेल्या वादग्रस्त भूखंड प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरींना अटक केली. त्यानंतर याच प्रकरणात एकनाथ खडसे यांची गुरूवारी नऊ तास चौकशी करण्यात आली. एकनाथ खडसे यांना या प्रकरणी अटक होईल अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती. मात्र त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं तसंच जेव्हा चौकशीसाठी बोलावलं जाईल तेव्हा एकनाथ खडसे चौकशीसाठी हजर राहतील असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं आहे.

पुण्यातील भोसरी येथील वादग्रस्त MIDC भूखंड एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसें आणि जावई गिरीश चौधरी यांनी संयुक्तिक रित्या भूखंड खरेदी केला होता. भूखंड खरेदी करतांना पैश्यांचा व्यवहार हा संशयास्पद असल्याचं ईडीला वाटतंय. यात जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार खडसें दाम्पत्यावर आहे असं अगोदरच मानलं जातं होत. खडसें परिवाराच्या एका पाठोपाठ ईडीने समन्स बजावलं आहे.

मंदाकिनी खडसेंनाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मंदाकिनी खडसेंनी 14 दिवसांची ईडी कडून मुदत मागितली आहे. मंदाकिनी खडसेंनी 14 दिवसानंतर ईडी च्या कार्यालयात हजर राहावं लागणार आहे .भोसरी भूखंडात जावई गिरीश चौधरी आणि मंदाकिनी खडसें यांच्याच नावाचा व्यवहार झाला असल्याने अटक ही होऊ शकते अशी चर्चा आता सुरू आहे. मंदाकिनी खडसे या एकनाथ खडसे यांच्या पत्नी आहेत .सध्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमन आहेत तसंच त्या माजी महानंदाच्या माजी चेअरमन ही होत्या.

काय आहे भोसरीचं भूखंड प्रकरण?

२०१६ मध्ये एकनाथ खडसे हे राज्याचे महसूल मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला गेला. एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्व्हे क्रमांक ५२/२ अ/ २ मधील तीन एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे हा खरेदी केला.

या भूखंडाचा व्यवहार ३ कोटी ७५ लाख रूपयांना अकानी नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केला. पण या भूखंडाचा सातबारा MIDC च्या नावावर होता. त्यामुळे खडसे यांनी पदाचा गैरवापर करून भूखंड खरेदी केल्याचा आरोप झाला. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावडे यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. एप्रिल २०१७ मध्ये ACB ने म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी आणि अकानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत चौकशीही सुरू केली.

मात्र २०१८  मध्ये त्यांना क्लिन चिट देण्यात आली. दरम्यान निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यासाठी झोटिंग समितीही नेमण्यात आली. या समितीमार्फत प्रकरणाची चौकशी झाली. त्यानंतर आता ईडीकडून चौकशी सुरू आहे. याआधीही एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. आता हे प्रकरण कुठवर जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्न कचऱ्यापासून निर्मित वीजेवर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करण्याचा देशातील पहिला मान मुंबईला!

Aprna

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनाने समन्वय ठेवावा! – मुख्यमंत्री

Aprna

आर्थिक संकट लक्षात घेता, येत्या काळात वैयक्तिक जीवनात काटकसरीने काम करा !

swarit