HW News Marathi
महाराष्ट्र

ईडीकडे आमच्या नेत्यांचे पत्ते आहेत का? संजय राऊतांचा सवाल

मुंबई | महाविकासआघाडी आणि विरोधी पक्षमध्ये नेहमीच वादावादी आणि टीका होत असतात. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नेहमीच भाजप विरोधात बोलत असतात. सध्या महाविकासआघाडीत असलेल्या नेत्यांच्या मागे ईडी चे सत्र लागले आहेत. त्यावर राऊत म्हणाले, केवळ ईडीकडे आमच्या नेत्यांचे पत्ते आहेत का? आमच्याकडेही त्यांचे पत्ते आहेत. ते आम्ही चौकशीसाठी देऊ, असं संजय राऊत म्हणाले. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा आढावा बैठकीसाठी राऊत आलेत. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. इथं पण अनेक घोटाळे आहेत. पण इथं ईडी किंवा सीबीआय का जात नाही. की फक्त यांच्याकडे खडसे, देशमुख, सरनाईक यांचेच पत्ते आहेत. भाजपवाल्यांचे पत्ते नाहीत का? आम्ही पण ह्यांचे पत्ते देऊ, असं ते म्हणाले.

सहकार हा राज्याचा विषय पण तो केंद्राशी जोडला

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, सहकार खातं केंद्रात काढून काही कार्यक्रम करायचा विचार असेल तर आम्हीही कार्यक्रम करू. खरं तर सहकार हा राज्याचा विषय पण तो केंद्राशी जोडला आहे, असं ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी केवळ केंद्रात सहकार खातं निर्माण केलंय का? तर मग हा परत एक सत्येचा गैरवापर आहे. राज्यातील सहकाराला अडचणीत आणण्याचा, त्रास देण्याचा या खात्याद्वारे कार्यक्रम केला असेल तर आम्हाला पण ह्यांचा कार्यक्रम करता येईल. मुळात सहकार हा राज्याचा विषय आहे. राज्याच्या ताब्यातील सहकाराला खतम करण्याचा प्रयत्न असेल तर लोकशाहीच्या दृष्टीने हा धोका आहे, असं राऊत म्हणाले.

भाजपची आता ताकद जास्त आहे म्हणजे ती सूज

भाजपची आता ताकद जास्त आहे म्हणजे ती सूज आहे. उद्या काय होईल, भाजपचे अनेक राष्ट्रवादीत किंवा दुसऱ्या पक्षात जातील, हे तुम्हालाही चांगलं माहीत आहे. इथले सगळे भाजपवाले ठेकेदारीत गुंतलेले आहेत. हा आमचा धंदा नाही, म्हणून अबाधितपणे मुंबईत आहोत, असं ते म्हणाले. इथं महाविकास आघाडीबाबत निर्णय योग्यवेळी घेऊ असंही ते म्हणाले. संजय राऊत म्हणाले की, पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव आहे, अशी राजकीय चर्चा आहे. गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा मोठा आहे. त्यांचं योगदान विसरता येणार नाही. मी कधी वाईट बोलत नाही, माझं एक असं स्टेटमेंट दाखवा की मी वाईट बोललोय. मला त्यांनी दाखवावं, यापुढे मी कोणाशी बोलणार नाही’, असं राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव मंजूर!

News Desk

जयंत पाटलांचे ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण!

News Desk

फडणवीसांनी भर पत्रकार परिषदेत लावला उपमुख्यमंत्र्यांचा तो व्हिडिओ

News Desk