HW News Marathi
महाराष्ट्र

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात थेट संजय राठोड यांचें नाव घेणं उचित नाही – एकनाथ शिंदे

औरंगाबाद | टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहे. विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते आणि वन मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात समोर आल्यापासून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेवर दबाव टाकण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे नेहमीच शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यात पुढे असलेले संजय राऊत यांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिलाय. तर नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे या प्रकरणी सावध प्रतिक्रिया दिली आहे.

”झालेली घटना दुर्दैवी आहे, मात्र, थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही, या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर बोलणे उचित राहील, थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव घेणं योग्य नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. औरंगाबादेत टीव्ही 9 मराठीकडे एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलीय. शिवसेनेची या प्रकरणात ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. आता संजय राठोड यांच्यावर कारवाई होणार का या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या ६५ वर्षांवरील कलाकारांना आता सेटवर काम करण्याची परवानगी

News Desk

‘आनंदाचा शिधा’चे वितरण महिनाभर सुरु राहणार

Aprna

कर्जमाफी झालेल्या शेतक-यांकडून व्याज घेऊ नका , बॅंकाना आदेश- मुख्यमंत्री

News Desk