HW News Marathi
महाराष्ट्र

मनात शिक्षणाची जिद्द होती, एकनाथ शिंदेंनी ७७.२५ टक्के मिळवत प्राप्त केली पदवी 

मुंबई | राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाच्या ५६व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन शिक्षणाला वयाची अट नसते हे दाखवून दिले आहे. शिंदे यांनी पदवी परीक्षेत ७७.२५ टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. शिंदे यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयातून पदवीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत ७७.२५ टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले आहेत. वयाच्या ५६व्या वर्षी पदवीधर होणारे ते राज्यातील बहुदा पहिलेच मंत्री असण्याची शक्यता आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे आले असता शिंदे यांनीच ते पास झाल्याची माहिती दिली. सगळ्यांनाच आपल्या मनासारखं शिक्षण घेता येत नाही. श्रीकांत डॉक्टर झाले. पण माझं शिक्षण अर्धवट राहिलेलं होतं. मनात शिक्षणाची जिद्द होती. तळमळ होती. शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे पदवीधर व्हायचंच अशी मनाशी खुणगाठ बांधली आणि जसा जसा वेळ मिळाला तशा परीक्षा दिल्या आणि आज बीए पास झालो, असं शिंदे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईबाहेरच्या लसवंतांनाही रेल्वे प्रवासासाठी खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

News Desk

आपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा, तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना! – गोपीचंद पडळकर

Aprna

जिल्हा बँक निवडणुकीत तिसऱ्यांदा पराभव; राजन तेलींचा भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

Aprna