HW News Marathi
महाराष्ट्र

“मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिलं”, खडसेंचा नाव न घेता फडणवीसांवर निशाणा

जळगाव | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडल्याचेही त्यांनी म्हटले होते. आणि वारंवार फडणवीस यांनी किती खालच्या पातळीचे राजकरण केले हे देखील खडसेंनी बोलून दाखवले होते. आता पुन्हा एकदा खडसेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. एका जाहीर कार्यक्रमात दोघांमधील वादाचं कथन करताना ‘मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिलं,” असं विधान खडसे यांनी केलं आहे. मुक्ताईनगर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

“नाथाभाऊ इतका दिलदार आहे की, आम्हाला सांगितलं गेलं नाथाभाऊ तू आता घरी बैस मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. नाथाभाऊवर मुक्ताबाईचा आशिर्वाद आहे, त्यामुळे मी म्हटलं घे रे तू भी क्या याद करेगा. मी भल्या भल्यांना दान देतो तर ब्राह्मणांना दान द्यायला काय हरकत आहे,” अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

आपण भाजप का सोडली याच कारण सांगताना खडसे म्हणाले, “भाजपनं एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केलं. एका व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं. या अशा लोकांमुळे मला भाजपा सोडवी लागली. जिथे आपलेच गद्दार होतात त्या घरात राहून काय उपयोग आहे. यांच्यापेक्षा दिलदार शत्रू बरा. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.मी अख्खं आयुष्य भारतीय जनता पक्षाला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भाजपशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसानं छळलं” अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील खंत पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जालना रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट केला जाणार! – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

Aprna

परमबीर सिंगांविरोधात आणखी एक तक्रार, उच्च नायायालयात मध्यरात्रीपर्यंत सुनावणी

News Desk

इंधन आणि वेळेच्या बचतीसाठी ‘मेट्रो’ उत्तम पर्याय! – एकनाथ शिंदे

Aprna