HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजप नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मुंबई | भाजप नेते एकनाथ खडसे हे आज (२३ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याने हा प्रवेश सोहळा तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात शुक्रवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता हा प्रवेश होणार असून याची तयारी करण्यात आली आहे. यावेळी एकनाथ खडसे आणि त्यांचे कार्यकर्ते याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत.

Related posts

जाणून घ्या… वांद्रेतील घटनेवर राज्यातील नेते मंडळींच्या ‘या’ प्रतिक्रिया

News Desk

मिरजमध्ये ‘माजी विद्यार्थी मेळाव्या’चे आयोजन

Gauri Tilekar

सकल मराठा समाजातर्फे उद्या मुंबई बंद

News Desk