HW News Marathi
महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने परळीत मुंडे बहीण-भावात मोर्चे बंधणीला सुरुवात

बीड | आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांसह नगरपरिषदेच्या देखील निवडणुका होणार आहेत. या अनुषंगाने परळी मतदार संघात मुंडे बहीण भावात मोर्चा बंधणीला सुरुवात झाली आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या परळी मतदार संघात यंदाच्या निवडणूक ह्या दोघांसाठी प्रतिष्ठेच्या असून या निवडणुकीत बाजी कोण मरणार याकडे संबंध राज्याचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडेंनी निवडणुकीच्या अनुषंगाने परळीत मॅरेथॉन बैठकाचे आयोजन करून बुथ प्रमुखांशी थेट संवाद साधला आहे. संघटनात्मक कार्याचाही त्यांनी आढाव घेतला आहे.

यावेळी शहरातील विविध प्रभागातील शक्ती केंद्रप्रमुख, प्रभारी आणि बुथ प्रमुखांच्या यशःश्री निवासस्थानी बैठका घेऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला. शहरातील राजकीय परिस्थिती, सामाजिक गणित, नागरिकांच्या अडी अडचणी व समस्या त्यांनी जाणून घेतल्या. भाजपच्या शहरातील संघटनात्मक कार्याचा देखील त्यांनी यावेळी आढावा घेतला. कोणताही मध्यस्थ न ठेवता त्यांनी बुथ प्रमुखांशी थेट व मनमोकळा संवाद साधल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याच्या चर्चा शहरात सुरू आहेत तर यंदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनेही जोराची तयारी सुरू असल्याचे दिसून आले.

सर्वच निवडणुका आपल्यासाठी प्रतिष्ठेच्या – धनंजय मुंडे!

आगामी काळात नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, या सर्वच निवडणुका आपल्यासाठी प्रतिष्ठेच्या असून या निवडणुका ताकतीने लढण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्याची गरज असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. २०१९  सालच्या विधानसभा निवडणुकीत माझ्या प्रत्येक सहकाऱ्याने स्वतःची निवडणूक समजून मनापासून काम केले, जनतेने आशीर्वाद दिला आणि मला परळी शहरातून २० हजारांचे मताधिक्य मिळाले. या जनतेचे आणि माझ्या सहकाऱ्यांचे मानावे तितके आभार कमी आहेत, त्यामुळेच परळी शहरातील प्रत्येक नागरिक व कार्यकर्त्यांचे समाधान करणे, त्यांच्या कामी येणे हे माझे कर्तव्य असून, शेवटच्या माणसाचे समाधान होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे मत धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना व्यक्त केले आहे.

विरोधक कमजोर असून त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, पंकजा मुंडेंवर धनंजय मुंडेंची टीका

विरोधक कमजोर आहेत, त्यांना प्रत्येक वार्डात द्यायला उमेदवार नाहीत, म्हणत पंकजा मुंडे यांना नाव न घेता लगावला टोला परळीत काही रस्त्यांची कामे अजूनही सुरू असल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची देखील चर्चा असते, परंतु काम पूर्ण करताना थोडा वेळ लागतोच, एकदा पूर्ण झाल्यास त्याचे चांगले परिणाम नक्कीच दिसतील. या बाबींचा विचार देखील करणे गरजेचे आहे. कोविड निर्बंधांच्या काळात निधी खर्चाविषयी बंधने असल्याने व्यापक विकासकामे मर्यादित राहिली मात्र आता मोठया प्रमाणात व्यापक कामे हाती घेण्यात येत आहेत. असे ही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

जनतेची केलेली कामे घेऊन आपण मजबुतीने पुन्हा त्यांच्यात जाऊ तेव्हा, निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत मत पेटीतून दिसेल आणि परळी मतदार संघ पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला सिद्ध होईल, असेही धनंजय मुंडे म्हणाले. एकंदर मुंडे बहीण भावात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चे बंधणीला सुरुवात झली असून परळीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र मुंडे बहीण भावाच्या प्रतिष्ठेच्या असणार हेही तितकेच महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहमदनगरमध्ये आणखी २ कोरोना पॉझिटिव्ह, महाराष्ट्राचा आकडा १९८ वर

swarit

गुणरत्न सदावर्तेंनी ST कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचे न्यायालयात केले मान्य, कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात

Aprna

बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करणार! – डॉ. जितेंद्र आव्हाड

Aprna