HW News Marathi
महाराष्ट्र

ॲमिनिटी स्पेसचा मुद्दा निकाली,अजित पवारांच्या उपस्थितीत मोठा निर्णय!

पुणे। सध्या पुण्यात चर्चेत असलेल्या ॲमिनिटी स्पेसच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं आता भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. अ‌ॅमिनिटी स्पेसला राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोध करण्याची भूमिका निश्चित केलं आहे. अजित पवारांच्या सूचनेवरुन अ‌ॅमिनिटी स्पेसला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले

ॲमिनिटी स्पेसच्या भाजपच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. एका गटानं विरोधी भूमिका घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. ॲमिनिटी स्पेसच्या मुद्यावर दोन गट पडल्यानं अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाली असून अ‌ॅमिनिटी स्पेसच्या प्रस्तावाला विरोध करणार आहे. प्रस्तावावर भूमिका ठरवण्यासाठी घेण्यात आलेली राष्ट्रवादीची बैठक संपली आहे.

खासदार वंदना चव्हाण यांनी या निर्णयाला विरोध केला

भाजपकडून पुणे महापालिकेच्या हद्दीतल्या ॲमिनिटी स्पेस दीर्घ मुदतीसाठी खासगी विकासकांना भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजूर केला आहे. आता हा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे निर्णयासाठी प्रलंबित आहे.भाजपकडून पुणे महापालिकेच्या हद्दीतल्या ॲमिनिटी स्पेस दीर्घ मुदतीसाठी खासगी विकासकांना भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजूर केला आहे. आता हा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे निर्णयासाठी प्रलंबित आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरूवातीला पाच उपसूचना देण्याचा निर्णय घेऊन हा प्रस्ताव मान्य करणार असल्याचं भाजपाला सांगितलं होतं. मात्र, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रस्तावावरून धुमजाव केलं होतं.

शरद पवारांना या प्रस्तावाची माहिती

पुणे महापालिकेच्या 185ॲमिनिटी स्पेस आणि 85 आरक्षित जागा अशा एकूण 270 जागा दीर्घ मुदतीने भाडेतत्वावर खासगी विकासकांना देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव आता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे प्रलंबित आहे. भाजपनं सर्वसाधारण सभेत बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर जरी केला तरी राज्य सरकारमार्फत हा प्रस्ताव विखंडित करण्याचा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता थेट शरद पवारांना या प्रस्तावाची माहिती देण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी वेळ मागितली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुलाच्या मतदार संघात ‘पावरी’ होत आहे आणि आमचे मुख्यमंत्री”

News Desk

मापात पाप करणारे सात पंप जप्त

News Desk

मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत गठित पथकाच्या माध्यमातून अनिष्ट विधवा प्रथा निर्मूलनसाठी प्रयत्न करा! – यशोमती ठाकूर

Aprna