HW News Marathi
Covid-19

‘२१ मे’ रोजी होणार महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच अखरे सुटला आहे. येत्या २१ मे रोजी मुंबईत विधानपरिषदेच्या ९ जागांवर निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणूक घेत असताना सोशल डिस्टन्सिंग आणि कोरनाबाबतच्या इतर सगळी काळजी घेणे बंधनकारक असणार आहे, असेही आयोगाने सांगितले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना २७ मे पूर्वी कोणत्याही एका सभागृहावर नियुक्त होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु होते. उद्धव ठाकरे यांचे नाव राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणूनही व्हावी. यासाठी महाविकासआघाडीने दोन वेळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पत्र पाठवले होते.मात्र, यावर राज्यपालांनी त्याबाबत अद्याप निर्णय न घेता. यामुळे महाविकासआघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. यानंतर आज अखरे केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानपरिषदेची निवडणूक घेण्यास परवानगी दिली.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपवर नाराज पंकजा मुंडेच्या मोदी सरकार २.० च्या वर्षपूर्तीला मात्र शुभेच्छा !

News Desk

१८ वर्षावरील नागरिकांना मोफत लसीचं गिफ्ट मिळणार? अजित पवार म्हणतात…

News Desk

दिलासादायक ! राज्यात १ लाखांच्या पुढे लोकं झाली कोरोनामुक्त

News Desk