मुंबई | राज्यावर आलेले जागतिक संकट म्हणजे कोरोना. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महावितरणाला दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता झाली आहे. दरम्यान, तसे आदेश महावितरणाला उर्जामंत्री डॉ, नितीन राऊत यांनी दिले आहेत. आजपासून (२३ मार्च ) मीटर रिडींग करण्यासाठी आणि बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी सरकारचे पुढील आदेश येईपर्यंत जाऊ नये, असे आदेश कर्मचाऱ्यांना उर्जामंत्र्यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या या काळात मीटर रिडींग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्यात यावे, अशी सूचनाच त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे. या काळात वीज बिलाची छपाई करण्यात येणार नाही. तसेच, महावितरणच्या वेबसाइटवर बिले उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. सोबतच ग्राहकांनी महावितरणाकडे नोंदविलेल्या मोबाइल नंबरवर बिलासंबंधीचे एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. तसेच, या काळात थकबाकीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. वीजचोरी आणि बिलासंबंधीच्या तक्रारीला अनुसरून ग्राहकांच्या घरी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन तपासणी करू नये अशा सूचना डॉ. राऊत यांनी महावितरण प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान, या संबधीत ट्विटही त्यांनी केले आहे.
5)Linestaff/ outsourcing staff/ billing staff should not visit any consumer premises for spot verification for bill complaint purpose or any theft detection.
All above instructions are to be followed untill further instructions.
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) March 22, 2020
राज्यात कोरोनाच प्रादुर्भाव आता वेगाने वाढायला लागला आहे. महाराष्ट्र कोरोनाच्या स्टेज २ वर आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राज्याला स्टेज ३ वर न जाण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आजपासून (२३ मार्च) मुंबईची लोकल सेवा सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बसने किंवा लोकलने प्रवास न करता घरीच थांबा असे आवाहन सरकारकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.