HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी आधी भेट बोनस

मुंबई । एसटी कर्मचाऱ्यांना २ हजार ५०० रुपये आणि अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये दिवाळी भेट देण्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी केली आहे. नोव्हेंबर महिन्यात पगार १ तारखेला होणार असून पगारवाढीतील थकबाकीची ५ हप्त्यांमधील रक्कम १ नोव्हेंबरच्या आधी देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. अधिका-यांना १० टक्के अंतरिम वेतनवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. वेतनवाढ आॅक्टोबर, २०१८ पासून ही लागू करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्यात २ टक्के वाढ होणार आहे. आॅक्टोबर, २०१८च्या वेतनात वाढीव महागाई भत्ता देण्यात येईल.

याबाबत अभ्यास करुन महामंडळाला शिफारस करण्यासाठी मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱ्यांची दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन महिन्यात अहवाल सादर करण्याबाबत या समितीस सुचीत केले असून त्यानंतर अधिकाऱ्यांना अंतिम वेतनवाढ दिली जाईल. अहवाल येईपर्यंत एकूण वेतनाच्या १० टक्के इतकी अंतरिम वाढ करण्यात आली आहे. एसटी कामगारांना दिवाळी भेट मिळावी. वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेला करावे, अशी मागणी होती. दोन्ही मागण्या मान्य झाल्याने आम्ही समाधानी आहोत, असे एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हे तर दारूप्रेमी सरकार!  : सचिन सावंत

News Desk

भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाकडे शरद पवारांना समन्स बजावण्याची मागणी

swarit

२०१९ च्या निवडणुकीनंतरही मीच मुख्यमंत्री, फडणवीसांचा दावा

Gauri Tilekar