HW News Marathi
महाराष्ट्र

समिती स्थापन झाल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, आजही राज्यात एसटी सेवा बंद

मुंबई। महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतूक सेवेत लालपरी अर्थात एसटी बस सेवेचे मोलाचे योगदान आहे. मात्र मागील काही वर्षांपासून ही सेवा आर्थिक संकटात सापडली आहे. परिणामी राज्यभरातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांना याचा फटका सहन करावा लागतोय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामुळे प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. अशातच राज्य सरकाने न्यायालयाच्या आदेशानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी समितीची स्थापन केली आहे. मात्र या समिती स्थापनेनंतरही सलग दुसऱ्य़ा दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरुचं ठेवला आहे. त्यामुळे आजही राज्यभरातील विविध एसटी आगारामधील कर्मचारी रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. सोमवारी ९० टक्के एसटी कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला होता.

आजही प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत विलीन करून घ्या या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी आंदोलन करत आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती स्थापन केला आहे. मात्र या समिती माहिती न्यायालयाला देऊनही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक ठिकाणी एसटी सेवा बंद असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आजही प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्य सरकारने आता खाजगी बस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस आणि मालवाहू वाहनांना प्रवासी वाहतूकीची परवानगी दिली आहे.

१५ दिवसांनी हायकोर्टाला माहिती देण्यात यावी

सरकारने स्थापन केलेल्या समितीकडून सर्व २८ एसटी कामगार संघटना आमि महामंडळाचे कर्मचारी यांचे म्हणणे, मागण्या ऐकून घेतल्या जाणार आहे. .या मागण्या आणि मुद्द्यांचा एक अहवाल समिती मुख्यमंत्र्यांसमोर सादर करेल, ८ नोव्हेंबरपासून ते १२ आठवड्यांत ही कार्यवाही पूर्ण करण्याची सूचना समितीला सरकारने केली आहे. या दरम्यान समितीच्या सुनावणीबाबत १५ दिवसांनी हायकोर्टाला माहिती देण्यात यावी असेही सरकारने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयंत ससाणे यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपलाः अशोक चव्हाण

swarit

संतापजनक! गर्भवती वनरक्षक महिला आणि पतीला माजी सरपंचाकडून मारहाण

Aprna

११ जूनपर्यंत बीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषदेचा निकाल 

News Desk