HW News Marathi
महाराष्ट्र

प्रधानमंत्री मोदी अथवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जरी आले, तरी माझा विजय निश्चित !

बीड | “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अथवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जरी आले, तरी विजय ही माझाच निश्चित, “असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे. राज्यासह देशाचे लक्ष लागून असलेल्या परळी मतदारसंघात पंतप्रधान मंत्री नरेंद मोदी यांनी भाजपच्या परळीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा घेतली. मोदींची परळीतील आज (१७ ऑक्टोबर) या सभेत हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. परळी मतदार संघात मुंडे बहीण भावात मोठी चुरशीची लढत सध्या पहावयास मिळत आहे.

तसेच पंकजा मुंडे व त्यांच्या विरोधात लढत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे हे दोघेही बहीण भाऊ प्रतिष्ठा पणाला लावून मोठ्या ताक्तिनिधी निवडणुकीच्या रणांगणात झोकून घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ” प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अथवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जरी आले तरी विजय ही माझाच निश्चित, “असा विश्वास धनंजय मुंडेंनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे पंकजा मुंडेंनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलतांना म्हणाल्या की, “माझा मोठा नेताच माझा प्रधान मंत्री आहेत ते माझे स्वभाग्य आहे तर विरिधकाकडे मोठे नेतेच उरले नाहीत त्यामुळे ते त्यांचे दुर्दैव्या आहे, त्यामुळे माझ्या प्रचारार्थ देश्याचे प्रधानमंत्री नरेंद मोदी येत आहेत हे आमचे व सर्व जनतेचे सौभाग्य आहे असे त्या म्हणाल्या होत्या.

पंकजा मुंडेंनी परळीतील प्रचार म्हणाल्या की, “माझा जिल्हा हा सर्वात जास्त पीक विमा घेणारा जिल्हा आहे. त्याचबरोबर महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी १ हजार करोड रुपयाचा निधी आम्ही उपलब्ध केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या येण्याने माझ्या बीड जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्या म्हणाल्या. येत्या २१ तारखेला जिल्ह्यतील सर्व उमेदवारांना परत प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन परत आपल्या सेवेसाठी व विकास साधण्यासाठी मतरुपी आशीर्वाद द्या,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंची आज पत्रकार परिषद; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Aprna

अत्याचारांना जागीच प्रतिबंध करणाऱ्या ‘निर्भया’ पथकांमुळे महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी! – उद्धव ठाकरे

Aprna

देवेंद्र फडणवीसांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार !

News Desk