मुंबई | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे मुंबईची चिंता खूप वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेतून मुंबई येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना क्वारंटाईन करणार असून प्रवाशांच्या शरीरातील नमुने जेमोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
दरम्यान, नव्या व्हेरियंटचा संसर्गाचा प्रादुर्भावाचा प्रसार होऊ नये. म्हणून राज्य सरकारने उद्या (२८ नोव्हेंबर) नव्या व्हेरियंटवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत महापालिकेने आज (२७ नोव्हेंबर) ५.३० वाजता बैठक बोलवण्यात आली आहे. ही बैठक ऑनलाईन पद्धतीने महापालिका आयुक्तही बैठक घेणार आहे. या बैठकील सर्व कोविड हॉस्पिटलचे डीन, टास्क फोर्स सदस्य, अतिरीक्त आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार आहे.
Every person returning from South Africa will be quarantined on arrival in Mumbai and their samples will be sent for genome sequencing: Mumbai Mayor Kishori Pednekar pic.twitter.com/bQwGlajO4Z
— ANI (@ANI) November 27, 2021
नव्या व्हेरियंटमुळे राज्यात नवी नियमावली
कोरोनाचा नवा व्हेरियंटच्या पार्श्वभूमीमुळे राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. नियमावलीनुसार मॉल, सिनेमागृहात, कार्यक्रमात दोन्ही डोन पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आसून मॉल, सिनेमागृह, कार्यक्रम आणि विवाह सोहळ्यात ५० टक्के लोकांची क्षमता असणे बंधनकारक केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.