HW News Marathi
महाराष्ट्र

‘राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा नाही, पण…’, देवेंद्र फडणवीस म्हणाले…..

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज(६ ऑगस्ट) मुंबईला भेट झाली आहे. त्यांच्या या भेटीवरून राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. भाजप-मनसे युती अशी चर्चा एकीकडे रंगात असताना, मनसे सोबत नाही असं मोठा विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. भेट होणं हे स्वाभाविक आहे, त्यात अन्य काही नाही, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे आणि आमच्या पक्षात फरक

देवेंद्र फडणवीस यांनी मनसे सोबत युती करणार नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. ‘राज ठाकरे आणि आमच्या पक्षात फरक इतकाच आहे, त्यांची परप्रांतियांशी जी भूमिका आहे, ती आम्हाला मान्य नाही. त्यांचा हिंदुत्वाचा आणि आमचा हिंदुत्वाचा मुद्दा हा समान धागा आहे. पण परप्रांतियाचा मुद्दा हा वेगळा आहे. भेट होणं हे स्वाभाविक आहे, त्यात अन्य काही नाही, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात कुणी कुणाला भेटावं यावर बंधणं नाही

चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटींमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर देवेंद्र फडणवीसांनी आपलं मत मांडलं आहे, “मला वाटतं महाराष्ट्रात कुणी कुणाला भेटावं यावर बंधणं नाहीत. राजकारणात जर आणि तरच्या मुद्द्याला स्थान नसतं. परप्रांतियांबद्दल त्यांच्या जी भूमिका आहे त्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. त्यांनी स्वीकारलेली हिंदुत्वाची भूमिका आणि आमचं हिंदुत्व हा समान धागा आहे. मात्र, अद्यापही दुसरा जो मुद्दा आहे त्याचं निराकरण होत नाही तोवर जर तरला काही महत्व नाही, असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, बाळा नांदगावकर यांनी ही सकारात्मक भेट आहे आणि भविष्यात मैत्रीचा हात पुढे केला जाईल अशी प्रतिक्रिया दिलीय. त्यावर विचारलं असता. बाळा नांदगावकर यांना तसं वाटलं असेल आणि ते स्वाभाविक आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

राज ठाकरे म्हणाले ‘पुन्हा या’

राज ठाकरेंशी चर्चा झाल्यावर चंद्रकांत पाटलांनी पुन्हा भेटण्याचे संकेत दिले आहेत. चंद्रकांत पाटील म्हणाले,”जेव्हा दोन भारतीय भेटतात तेव्हा ते चहा पाणी झाल्यावर पुन्हा येण्याचं आमंत्रण देतात. असंच आमंत्रण राज ठाकरेंनी मला दिलं आहे. मीही त्यांना माझ्या घरी चहासाठी निमंत्रण देतो. या सगळ्यात कोणताही राजकीय हेतू नव्हता. फक्त आमच्या आवडीनिवडी आणि स्वभावावरून चर्चा करण्यात आली आहे.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंत्ययात्रेदरम्यान पूल कोसळून २५ जण नदीत कोसळले

News Desk

काँग्रेस नेत्यांनाही चक्रीवादळाचा जबर फटका, नांदेडमध्येच थांबावे लागणार

News Desk

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सोमय्या ईडी कार्यालयात!

News Desk