HW News Marathi
देश / विदेश

दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती

मुंबई | महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्यावर नवी जबाबादरी देण्यात आली आहे. पडसलगीकर यांना राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पडसलगीकर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचे सहाय्यक म्हणून काम करणार आहेत. पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पडसलगीकर यांच्याकडे त्यांच्याकडे अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दत्ता पडसलगीकर हे १९८२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पडसलगीकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. मुंबईतील कुख्यात गुंड अमर नाईकला पडसलगीकरांच्या नेतृत्वात झालेल्या कारवाईतच त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्तपदी असताना पडसलगीकरांनी कामाठीपुऱ्यातील कुंटणखान्यातून त्यांनी जवळपास ४५० अल्पवयीन मुलींची सुटका करुन त्यांचे पुनर्वसन केले होते.

पडसलगीकर यांची २०१६ मध्ये मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी वर्णी लागली होती. त्याआधी दहा वर्ष त्यांनी आयबीमध्ये सेवा बजावली होती. त्यांनी नागपूर, कराड आणि नाशिकमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Budget 2023 Live Updates: “7 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना आयकरातून सूट”; निर्मला सीतारमण यांची घोषणा

Aprna

प्रताप सरनाईकांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीची बैठक, एकनाथ शिंदेंनी बैठकीनंतर दिली ‘ही’ माहिती

News Desk

काश्मीर मुद्द्यावरून अमित शहा आणि अजित डोवाल यांची बैठक

News Desk