HW Marathi
महाराष्ट्र

पावसामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द 

पुणे | पुणे शहर आणि जिल्ह्याला बुधवारी दुपारपासून पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. दरम्यान अतिवृष्टी आणि चक्रिवादळामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आज होणाऱ्या सर्व नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल अशी माहिती कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे

राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून गुरुवारी होणाऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या अडचणी येऊ शकतात. यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related posts

शिवसेना १५ दिवसात लोकसभा, तर दोन महिन्यात विधानसभा उमेदवार जाहीर करणार

News Desk

केरळमधील नागरीकांना पुण्यातून जाणार पिण्याचे पाणी

News Desk

महाराष्ट्रातील पाच महाविद्यालये झाली ‘स्वायत्त’ 

News Desk