HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा पॅटर्न ठरला! 

मुंबई | राज्यात कोरोनामूळे सर्व परीक्षा, शाळा यांच्यावर बंदी आली होती. मात्र हळूहळू बाबी पुर्वपदावर येण्यास सुरुवात होत आहे. मुंबई विद्यापीठाची ऑनलाईन थेअरी परीक्षा घेताना सुरवातीला बॅकलॉग परीक्षा २५ सप्टेंबरपासून घेण्यात येणार आहेत. तर अंतिम वर्षाची परीक्षा १ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहेत. या थेअरी ऑनलाईन परीक्षा बहुपर्यायी असून ५० मार्कांसाठी १ तासाचा वेळ असणार आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी सुविधा उपलब्ध नसल्यास स्थानिक प्रशासनाची मदत घेण्यात यावी अशा सूचना सुद्धा देण्यात आहेत. तर अपवादात्मक परिस्थितीत परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे.

थेअरी परीक्षा बहुपर्यायी असल्याने विद्यापीठ अधिष्ठाता, महाविद्यालय प्राचार्य यांनी question bank तयार करून या परीक्षांसाठी question set तयार करण्यात येणार आहेत. शिवाय, या पद्धतीचा सराव व्हावा यासाठी महाविद्यालयांनी सॅम्पल प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडविण्यास देण्यात याव्यात असे सुद्धा या परिपत्रकात सांगितले आहे. एखादा विद्यार्थी जर परीक्षा काही कारणास्तव देऊ शकला नाही तर त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठ परीक्षा घेण्यास पूर्णपणे सज्ज झाले असून सविस्तर परीक्षेबाबत वेळापत्रक क्लस्टर महाविद्यालयातील लीड महाविद्यालय सर्वांशी चर्चा करून जाहीर करणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पडळकर, खोत कमी पडले!”; ST कर्मचाऱ्यांबाबत Anil Parab यांचं विधान

News Desk

शिवसेना नेते आनंदराव आडसुळांना दिलासा नाहीच!

News Desk

“…तर आम्हाला आत्महत्या करायला परवानगी द्या”‘ मुख्यमंत्र्यांकडे धक्कादायक मागणी!

Ruchita Chowdhary