मुंबई | आझाद मैदानात शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मोर्चाने फक्त महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण देश हदरुण गेला आहे. हे शतकरी आठवडाभर नाशिकहून मुंबईला २०० कि.मी पायपीट करुन सरकारकडे आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आले. त्याच वेळी याच आझाद मैदानाच्या एका बाजूला काही अंध व्यक्ती जाहीर उपोषणाला बसले आहेत. हे सर्वजण सरकारकडे त्यांच्या सार्वजनिक वैयक्तिक मागण्याच्या पुर्ततेसाठी उपोषण करत आहेत. परंतु या लोकांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे.
सरकारने सत्तेत येण्यासाठी अनेक आश्वासने दिली. पण, ती आश्वासने सत्तेत आल्यानंतर मात्र पुर्ण केली नाही. आम्ही २०१४ मध्ये सुद्धा उपोषणला बसलो होतो. तेव्हा देखील आमच्या एकही मागण्या फडणवीस सरकारने पुर्ण केल्या नसल्याचे आरोप सिद्धेश्वर जोगदंड यांनी केला आहे.
त्याचबरोबर या आझाद मैदानात उन्हा ताणात उपोषणाला बसलेल्या या अंध लोकांसोबत फडणवीस सरकाची वर्तवणुक या व्हिडिओत आपल्याला दिसत आहे की, कशाप्रकारे पोलीस यांच्याशी वागत आहेत. हेच का ते सरकार जे सत्तेत येण्यासाठी सर्व लोकांना आश्वासने देऊन सत्तेत आले.
सर्वसामान्य मानसांना त्यांच्या हक्कासाठी आणि समस्यांसाठी सरकारकडे तडजोड करावी लागते. काय वाटते या सरकारला सामान्य जनतेचा विसर पडला आहे का? ह्याची जाणीव शेतकऱ्यांचा मोर्चा, अंध व्यक्तींचे उपोषण आणि बऱ्याच अशा घटना आहेत की, ज्यांनी हे कळते की, सरकार कितपत सामान्य माणसांच्या समस्यासाठी संवेदशील आहे. तर मग पाहू या अंध व्यक्तीच्या समस्या आणि त्या समस्यांवर निवारण कितपत मिळेल. आता यावर इतकच बोलावसे वाटते की कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र माझा…!
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.