HW News Marathi
देश / विदेश

ट्विटरवर जगात सर्वाधिक ‘फेक’ फॉलोअर्स नरेंद्र मोदींचे!

मुंबई | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असल्याची चर्चा सगळ्याच जगात सुरू आहे. पण मोदींचे ट्विटरवरचे 60 % फॉलोअर्स फेक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसंच जगात सर्वात जास्त फेक फॉलोअर्स नरेंद्र मोदींनाच असल्याचंही पुढे आलंय.

नुकतंच ट्विटरने त्याच्या अकाऊटंसचं ऑडिट केलं. यामध्ये फेक फॉलोअर्सचा छडा लावण्यात आला. नरेंद्र मोदींना ट्विट्वरवर एकूण 4 कोटी फॉलओअर आहेत. त्यातील 2कोटी 40 लाख फॉलोअर्स बनावट आहेत. या यादीत मोदींच्या खालोखाल पोप फ्रान्सिस यांचं नाव आहे. या यादीत डॉनाल्ड ट्रम्प चौथ्या नंबरवर आहेत. त्यांचे 37 टक्के फॉलोअर्स नकली आहेत

निवडणुकीच्या रणधुमाळीत मोदींचे समर्थक त्यांच्या अनेक न केलेल्या कार्यांचीही स्तुती करत असतात. पण आता ट्विटरनेच ही यादी दिली असल्यामुळे पंतप्रधान जगात खरंच किती प्रसिद्ध आहेत याबद्दल संभ्रम निर्माण झालाय. टाईम्स मॅग्झिनच्या यादीतही याआधी नरेंद्र मोदी झळकले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाजपेयींना श्रद्धांजली देण्यास नकार देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला मारहाण

swarit

भारतीयांची युरोपीयन देशांमध्ये जाण्याची अडचण दूर होईल – अदर पुनावाला

News Desk

#MahatmaGandhi : पंतप्रधान मोदी, सोनिया गांधी यांच्यासह दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk