HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस, भाजपाविषयीचा तिरस्कार उध्दव ठाकरे यांच्या भाषणातून व्यक्त झाला – प्रविण दरेकर

मुंबई। महाराष्ट्राच्या जनतेसाठी राज्य सरकारचे दोन वर्षातील योगदान व सरकारची पुढील दिशा काय असेल याची माहिती राज्याच्या कोटयवधी जनतेला आजच्या भाषणातून मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईत काय कामं झाली हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु मुंबईच्या कामाची काय स्थिती आहे.हे मुंबईकरांना चांगलेच माहित आहे. आजच्या भाषणामध्ये देवेंद्रजी फडणवीस व भाजपा विषयीचा टोकाचा तिरस्कार व तिडीक वारंवार व्यक्त होताना दिसत होती अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज शिवसेना दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणासंदर्भात प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, हिंदुत्व व मराठीविषयीची भूमिका पुन्हा अधोरित करण्याचा उध्दव ठाकरे यांनी प्रयत्न केला.

कारण हिंदुत्वाच्या विरोधात सातत्याने गरळ ओकणा-यांच्या बाजूला

त्यांना पुन्हा आज हिंदुत्वाचा विषय उपस्थित करावा लागला हे सुध्दा उल्लेखनीय आहे. कारण हिंदुत्वाच्या विरोधात सातत्याने गरळ ओकणा-यांच्या बाजूला केवळ सत्तेसाठी मांडीला मांडी लावून आचार विचार बाजूला सोडून शिवसेना सत्ता उपभोगत आहे आणि भाजापावर सत्तेसाठी वाटेल ते अथवा सत्तापिपासू अशी टीका करणे नेमक्या शिवसेनेच्या कोणत्या संस्कृतीत बसते असा सवालही दरेकर यांनी केला.

गेली २५ वर्षे शिवसेना व भाजपा एकत्र असल्यामुळेच शिवसेनेला प्रत्येक निवडणुकांमध्ये यश मिळाले.

तुमच्या मंत्रीमंडळात किती कट्टर शिवसैनिक आहे

मागील विधानसभा निवडणुकीतही राज्यातील जनतेने भाजपाला सर्वाधिक जनाधार दिला. सर्वात जास्त जागाही जिंकून दिल्या. तसेच आजही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही भाजपाला सर्वाधिक यश मिळाले आहे व सर्वात मोठा पक्ष भाजपाच ठरला असल्याचे दरेकर यांनी निर्दशनास आणून दिले. तसेच पंढरपूरच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार समाधान अवताडे, देगलुरच्या निवडणुकीत सुभाष साबणे हे उपरे असे म्हणणारे तुमच्या मंत्रीमंडळात किती कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळचे किती निष्ठावान शिवसैनिक तुमच्या मंत्री मंडळात आहेत, याचे उत्तरही शिवसेनेने द्यावे. सध्यांच्या मंत्रीमंडळातील शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंकरराव गडाख तर खासदार प्रियांका चतुर्वेदी ही मंडळी तर उपरीच आहेत ना असा सवालही दरेकर यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीच्या नेत्यांचे आज ED विरोधात आंदोलन

Aprna

राज्यात ओमायक्रॉनचा नवा व्हेरियंट सापडल्याने एकाच खळबळ; जाणून घ्या आरोग्य मंत्री काय म्हणाले

Aprna

नारायण राणे यांची कॉँग्रेसला सोडचिठ्ठी

News Desk