HW News Marathi
महाराष्ट्र

‘फडणवीस म्हणाले, राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाही’, आता थेट राणेंचं उत्तर!

मुंबई। भाजप नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याला पाठिंबा नाही. पण राणेंच्या पाठीशी आहोत, असं विधान केलं होतं. त्याला भाजप नेते नारायण राणे यांनी थेट उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतात ते मी स्वीकारेल, असं नारायण राणे म्हणाले.

ते जे सांगतील ते मी स्वीकारेल

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना फडणवीसांच्या विधानाबाबत आणि कोर्टाच्या आदेशाबाबत विचारण्यात आलं. त्यावर राणे म्हणाले की, माझे शब्द बरोबर आहेत. कोर्टाची ऑर्डर वाचून दाखवली ना. फडणवीस आमचे मार्गदर्शक आहेत. आम्हाला मार्गदर्शन करतात. ते जे सांगतील ते मी स्वीकारेल, असं राणेंनी सांगितलं.

पवारांना सवाल

दुसरं एक वाक्य आहे, योगी साहेबांबद्दल. हा योगी आहे का ढोंगी? चपलाने मारलं पाहिजे. एका मुख्यमंत्र्याला म्हणतात चपलाने मारलं पाहिजे. तिसरा प्रश्न अमित शाह यांच्याबद्दल. मी आणि अमित शाह यांनी बसून ज्या काही पुढच्या वाटचालीबद्दल आखणी केली होती आता मी निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दाम वापरतो. हा अनपार्लमेंट्री शब्द नाही का? आपले आधी तपासले पाहिजे. याच्यात तो गाळलेला शब्द आहे. काय हो माननीय पवार साहेब? काय सज्जनपणा आहे. एवढं चांगलं बोलणाऱ्याला मुख्यमंत्री केलं ते चुकीचं केलं असं वाटत नाही का?, असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांची काय भाषा आहे. आम्ही राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून आम्ही बोललो, असं ते म्हणाले.

ज्यांनी दिशा सालियानची हत्या केली ते आत जाईपर्यंत आता…

अनिल परब अधिकाऱ्यांना आदेश देतो की पकडा त्याला. अरे काय सुरु आहे. दिशा सालियान प्रकरणात कोण मंत्री उपस्थित होता? त्याचा छडा का लागत नाही. पूजा चव्हाण प्रकरणातही तेच झालं. आता त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही. त्या मंत्र्याविरोधात कोर्टात जाणार. लोकशाही मार्गानं लढा देणार. ज्यांनी दिशा सालियानची हत्या केली, ते आत जाईपर्यंत आता स्वस्थ बसणार नाही, अशा सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. अनिल परब यांच्या प्रकरणातही चौकशी सुरु आहे, त्याचाही आता पाठपुरावा सुरु राहील, असंही राणेंनी म्हटलंय. काही गोष्टी करायला हे प्रवृत्त करत आहेत. फार सभ्य आहेत ना, काहीच करत नाहीत ना, आता जनतेला त्यांची करामत कळू द्या, अशा कडक शब्दात राणेंनी शिवसेनेवर हल्ला चढवलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानभवनासमोर कांदा फेक आंदोलन

News Desk

नितिन गडकरी यांनी शिवसेनेच्या नेत्यांची का घेतली भेट?

News Desk

“१९ महिने काय तुम्ही झोपा काढत होता का?” चंद्रकांत पाटलांचा पलटवार!

News Desk