HW News Marathi
महाराष्ट्र

“मी असं काय बोललो होतो त्याचा राग आला?”, नारायण राणेंचा सवाल

मुंबई | केंद्रीय मंत्री नाराय राणे यांना काल(२४ ऑगस्ट) कोर्टाने जमीन मंजूर केला आहे. त्यानंतर आज(२५ ऑगस्ट) नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी त्यांचं मत मांडलं आहे. “मी असं काय बोललो होतो त्याचा राग आला?”, असा सवाल नारायण राणेंनी विचारला आहे. नारायण राणे यांनी या परिषदेतून ठाकरे सरकारवर वारही केला आहे.

माझा पक्ष माझे खंबीर पाने उभा राहिला

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या वाक्यच स्पष्टीकरण दिलं आहे. “या सर्व लढ्यात आमच्या विरोधी मित्राने लढा सुरु केला. त्यामध्ये माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहीला. त्यामुळे मी जे पी नड्डा, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस तसेच सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे. मी असं काय बोललो होतो त्याचा राग आला? ते वाक्य मी परत बोलणार नाही. भूतकाळात एखादी घटना घडली आणि कसा क्राईम होतो? काय पत्रकारिता आहे? आम्ही पाहिलीच नाही. आक्षेप नाही. शिवसेनेच्या नेत्याने असे शब्द उच्चारले नाहीत?” असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका

नारायण राणे यांनी या परिषदेच्या वेळेस देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. टीका करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना तीन प्रश्न विचारले आहेत. “1 ऑगस्टला बीडीडी चाळीचं पूलबांधणीचा कार्यक्रम होता. त्याअगोदर आमचे आमदार प्रसाद लाड यांनी सेना भवन बद्दल काहीतरी वक्तव्य केलं होतं. आमच्या महिलांवर हात टाकला तर, असं बोलले होते. मी जे बोललो होतो आपल्या देशाला अभिमान नसेल त्याला राष्ट्रीय सण माहीत नसतात. देशाबद्दल अभिमान आहे. त्यामुळे मला सहन झालं नाही. त्यामुळे मी ते बोललो.

ते महाशय काय बोलले, म्हणजे मुख्यमंत्री, सेना भवनाबद्दल असं कोणी भाषा करेल तर त्याचं थोबडं तोडा, आदेश दिले. हा क्राईम नाही? 120 बी होत नाही? पत्रकारांनी मला शिकवावं. नाहीतर मी वकीलच डाव्या बाजूला घेऊन बसलो आहे. दुसरं एक वाक्य आहे, योगी साहेबांबद्दल. हा योगी आहे का ढोंगी? चपलाने मारलं पाहिजे. एका मुख्यमंत्र्याला म्हणतात चपलाने मारलं पाहिजे. तिसरा प्रश्न अमित शाह यांच्याबद्दल, मी आणि अमित शाह यांनी बसून ज्या काही पुढच्या वाटचालीबद्दल आखणी केली होती आता मी निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दाम वापरतो. हा अनपार्लीमेंट शब्द नाही? असे सवाल राणे यांनी केले आहेत.

शिवसेनेला मोठं करण्यात माझा हात मोठा

नारायण राणे यांनी आज(२५ ऑगस्ट ) पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी “शिवसेना मोठं करण्यात माझा मोठा हात आहे”, असं विधान त्यांनी केलं आहे. “शिवसेना जव्हा स्थापन होत होती तेव्हा माझा सगळ्यात मोठा हात होता. आताचे जे शिवसैनिक आहेत ते कुठे दिसत आहेत? मी कर्तृत्ववान आहे म्हणून मी आज इथे आहे, शिवसेनेचे नेते का नाही दिसत कुठे?”, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

कसला पराक्रम?

शिवसैनिकांनी काल(२४ ऑगस्ट) नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर आंदोलन केलं होतं. त्यालाच प्रत्युत्तर आजच्या परिषदेत नारायण राणेंनी केलं आहे. ते म्हणाले, “कसला पराक्रम करून आलेत हे, उलट मार खाऊन आलेत. त्यातली १२ जन आता दवाखान्यात ऍडमिट आहेत. हाच का तुमचा पराक्रम? हा पराक्रम केल्यावर तुम्हाला तुमच्या साहेबांकडून शाबासकी मिळाली असेल. त्यांना कितीही आंदोलनं करायची आहेत ती करू द्यात. मी घाबरत नाही. कितीही मोर्चे काढायचे आहेत ते काढू द्या, पोलिस त्यांच्या कडे लक्ष देताच आहेत, आम्ही कायद्याने चालणारी माणसं आहोत कायद्यानेच वागू”, असं ते म्हणाले आहेत.

काही चॅनेल त्यांना वाचवण्याची सुपारी घेत आहेत

पत्रकार परिषद चालू असताना, नारायण राणे यांनी पत्रकारांवर देखील हल्ला चढवला आहे. “काही चॅनेल्सनी त्यांना वाचवण्याची सुपारी घेतली आहे”, असं नारायण राणेंनी सांगितलं आहे. याआधीही नारायण राणे यांनी पत्रकारांवर निशाणा साधला आहे. ” मी आता काहीच वक्तव्य करणार नाही. कारण मी काही बोलो तर लेगच चॅनेल वाले ते टाकतील आणि त्याची बातमी बनेल. पण या आधी जे गेलं त्यावर माझा आक्षेप नाही”, असं नारायण राणे म्हटले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीत आमचा थोडक्यात पराभव – जयंत पाटील

News Desk

“जागा आणि वेळ तुम्ही ठरवा मी येते…”उर्मिला मातोंडकरांचे कंगनाला आव्हान 

News Desk

“देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं”, गृहमंत्र्यांचा गंभीर आरोप   

News Desk