नवी दिल्ली | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस विभागात बदलीसाठी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. यावरुनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (२५ मार्च) खास क्रिकेटच्या शैलीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणाले कि, “माझं ठरलंय. मी आता वेगवान बॉलिंगही करणार, गुगलीही करणार आणि बॅटिंगला येईन तेव्हा शॉट्सदेखील खेळणार आहे.” दरम्यान, फडणवीसांचे हे वक्तव्य ठाकरे सरकारसाठी स्पष्ट इशारा मानला जात आहे. याच मुद्याला धरत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
‘मोठी विकेट ही लूज बॉलवरच जाते, हे फडणवीसांनी लक्षात ठेवावे’
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या ठिकाणी मला फटकेबाजी करायला मजा येते, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी लूज बॉलवर फटकेबाजी जरूर करावी. पण मोठ्या विकेट या लूज बॉलवरच जातात, हे त्यांनी लक्षात ठेवावे. स्पिनर बॉलर कधी फास्ट चेंडू टाकत नाही. महाराष्ट्रात फक्त चंद्रशेखर भागवत हे एकटेच गुगली टाकायचे. बाकी गुगली गोलंदाज हे डुप्लिकेट आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (२५ मार्च) खास क्रिकेटच्या शैलीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणाले कि, “माझं ठरलंय. मी आता वेगवान बॉलिंगही करणार, गुगलीही करणार आणि बॅटिंगला येईन तेव्हा शॉट्सदेखील खेळणार आहे.” दरम्यान, फडणवीसांचे हे वक्तव्य ठाकरे सरकारसाठी स्पष्ट इशारा मानला जात आहे.
देवेंद्र फडणवीस महाविकासआघाडीला इशारा देताना म्हणाले कि, “क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला मिळाली की मजा येते. मी लहानपणी क्रिकेट खेळायचो, तेव्हा बॅटिंगही करायचो आणि बॉलिंगही करायचो. फिल्डींग क्वचित करायचो. पण जेव्हा फिल्डींग करायचो तेव्हा माझ्याकडून कॅच कधीच सुटायची नाही. आता मात्र माझं ठरलंय. मी आता वेगवान बॉलिंगही करणार, गुगलीही करणार आणि बॅटिंगला येईन तेव्हा शॉट्सदेखील खेळणार आहे.”
सध्याच्या परिस्थितीत मला इतके लूज बॉल मिळतायत कि…!
देवेंद्र फडणवीस याविषयी बोलताना पुढे म्हणाले कि, “सध्याच्या परिस्थितीत मला इतके लूज बॉल मिळतायत की ते बॉल मला सीमारेषेपार पाठवावेच लागतील. बॉलिंगचं म्हणायचं तर मी बॉडीलाईन बॉलिंग करत नाही. मी अतिशय लॉजिकल आणि ऑन द स्टम्प बॉलिंग करतो. मला वाटतं की त्यामुळेच समोरच्यांना बॅटिंग करताना अडचण होते.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.