HW News Marathi
Covid-19

भाजपशासित राज्यांतच ‘मोदी मॉडेल’चा फज्जा !

मुंबई । देशातील भाजपशासित राज्यांमध्येच ‘मोदी मॉडेल’चा फज्जा उडाला असल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे राष्ट्रीय पॅनल प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली आहे. “२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने ज्या ‘गुजरात मॉडेल’ चा डंका पिटवून देशातील सत्ता काबिज केली, त्याच गुजरातमधे कोरोनाची दूसरी लाट बेफिकीरपणे हाताळल्याबद्द्ल तिथल्या स्थानिक प्रसारमाध्यमांनीच वस्तुस्थिती मांडत सरकारचे वाभाडे काढले आहे. तर गुजरात उच्च न्यायालयानेही याबाबत नाराजी व्यक्त करीत खडे बोल सुनावले आहेत. यामुळे, गुजरातचे ‘अकार्यक्षम मॉडेल’च आता देशापुढे उघड झाले आहे”, अशी बोचरी टीका काँग्रेसने केली आहे.

गेल्या महिन्याभरातील वरील राज्यांअंतर्गत परिस्थितीच्या सर्वेक्षणानंतर भाजपची सरकारे असलेल्या राज्यातच ‘मोदी मॉडेलचा फज्जा’ उडाला असल्याची टीका अनंत गाडगीळ यांनी केली आहे. “उत्तर प्रदेशात एकीकडे एका मैदानात एकत्रितपणे शेकडो प्रेतांना अग्नि दिला जात असल्याचे फोटोज परदेशी वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केकेले आहेत. तर दुसरीकडे गंगेतून प्रेत वाहत असल्याची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. उत्तर प्रदेश हे आता ‘नाथांचे नसून अनाथांचे राज्य’ बनत चालले आहे”, अशी टीकाही काँग्रेसने केली आहे.

“गोव्यामधे ऑक्सिजनअभावी शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. कर्नाटकमध्ये तर स्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की बेंगलुरु शहरात महापालिकेला एकूण १३ पैकी आता ७ स्मशानभूमी या ‘कोरोना-मृतांसाठी राखीव’ ठेवाव्या लागण्याची वेळ आली आहे”, असे म्हणत काँग्रेसने मोठी चिंता व्यक्त केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना २४ तासांत ३ वेळा फोन, राज्यात ऑक्सिजन तुटवड्यामुळे परिस्थिती चिंताजनक!

News Desk

लसीकरण फसल्यामुळे मोदींच्या अपयशावर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न, नाना पटोलेंचा घणाघात

News Desk

यवतमाळमधील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला

News Desk