HW News Marathi
Covid-19

पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे निधन

पुणे | पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन आणि उद्योजक सम्राट मोझे यांचे हृदविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. सम्राट मोझे यांच्या अंगावर भरमसाट सोने घालण्यासाठी ते प्रसिद्ध होते. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान सम्राट मोझे यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवड्यातच त्यांनी आपला ३९वा वाढदिवस साजरा केला. दररोज मोझे हे अंगावर तब्बल साडेआठ किलो सोने घालत होते.

काही दिवसांपूर्वीच बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून सम्राट मोझे यांची बदनामी केली जात असल्याची तक्रा पोलिसांच्या सायबर सेलमध्ये केली होती. मोझे यांचे बालपण चिंचवड गावात गेले असून त्यांचे प्राथमिक शिक्षण चिंचवडच्या चापेकर शाळेत झाले. यानंतर मोझे पुण्यात स्थायिक झाले. मोझे यांना चुलते आणि माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या राजकीय कारकिर्दीमुळे त्यांना राजकीय वारसा लाभला.

पुण्यात राष्ट्रवादीकडून पुणे मनपा निवडणूक उमेदवारी मागण्यासाठी सम्राट मोझे यांनी चक्क अंगावर साडे आठ किलो सोने घालून मुलाखात दिली होती. यापूर्वी अंगावर दोन किलो सोने असलेल्या रमेश वांजळे यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारले होते. सम्राट पुण्याच्या संगमवाडीच्या प्रभाग क्रंमाक १३ मधून निवडणूक लढवणार होते. आपण केलेल्या सामाजिक कार्यामुळे अजित पवार हे आपल्यला पुणे महानगर पालिका निवडणुकीची तिकीट देणारच, असा विश्वास सम्राट मोझे यांनी त्यावेळी व्यक्त केला होता.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोठी बातमी ! Twitter India च्या कार्यालयांवर दिल्ली पोलिसांचे छापे

News Desk

‘रेड झोन’मधील विमानतळ अशा परिस्थितीमध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक !

News Desk

राज्याला दिलासा ! नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला

News Desk