HW News Marathi
Covid-19

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचे पॅकेज

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज आत्मनिर्भर भारतासाठी जाहीर केले आहे. त्याची सविस्तर माहिती केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देत आहेत. आज माहिती देण्याचा तिसरा दिवस आहे. शेती आणि कृषी उद्योगासाठी महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले.

सगळ्या प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी काम करत असतात असेही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट सांगितले. मत्स्य व्यवसाय आणि पशुपालन यासाठीही घोषणा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. आज ११ घोषणा करण्यात येतील ज्यापैकी ८ कृषी क्षेत्राशी संबंधित असतील असेही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचे पॅकेज देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आली आहे. खाद्य पदार्शांशी संबंधित उद्योगांना १० हजार कोटींची मदतही जाहीर करण्यात आली आहे असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ६,७४१ नवे रुग्ण, तर २१३ जणांचा झाला मृत्यू

News Desk

सिन्नरमध्येही ‘पारनेर’ पॅटर्न ! राष्ट्रवादीने पुन्हा फोडले शिवसेनेचे ५ नगरसेवक 

News Desk

खडसे, पंकजा, बावनकुळे, तावडे ‘ही’ मंडळी अस्वस्थ, नव्या भूकंपाची वात पेटू नये !

News Desk