HW News Marathi
Covid-19

सिन्नरमध्येही ‘पारनेर’ पॅटर्न ! राष्ट्रवादीने पुन्हा फोडले शिवसेनेचे ५ नगरसेवक 

नाशिक | राज्यात महाविकासाआघाडीची सत्ता असतानाही पारनेरनंतर आता राष्ट्रवादीने पुन्हा एकदा शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे ५ नगरसेवक फोडले आहेत. विशेष म्हणजे सिन्नर हा कायमच शिवसेनेचा गड मानला जातो. सिन्नर नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पद दोन्ही शिवसेनेकडे होते. मात्र, बुधवारी (२९ जुलै) झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटेंनी शिवसेनेचे ५ नगरसेवक फोडले आहेत. त्या ५ नागसेवकांपैकी १ असलेल्या बाळासाहेब हुगले यांना उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीने सिन्नरमध्ये ‘पारनेर’ पॅटर्न वापरला आहे.

राज्यात एकत्र सत्ता स्थापन करण्यापूर्वीच पारनेरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची नगरपंचायतीवर एकत्र सत्ता आली होती. मात्र, आता निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी चक्क पक्षाला रामराम ठोकत ४ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होती. राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या या फोडाफोडीच्या राजकारणामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, त्यानंतर या ५ नगरसेवकांनाअजित पवार यांनी पुन्हा शिवसेनेत परत पाठवले. मात्र, पारनेरनंतर आता पुन्हा एकदा सिन्नरमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेचे फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रासाठी येणारा ऑक्सिजन कर्नाटकात थांबवण्याचा हा निर्णय केंद्राचा !

News Desk

संक्रमित रुग्णांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमाकांवर

News Desk

‘MPSC परीक्षा रद्द होऊ नयेत’ हे माझं वैयक्तिक मत होतं, मात्र…! भुजबळांची नाराजी ?

News Desk