HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीसह ‘ही’ २ राज्य वगळून आज देशभर शेतकऱ्यांचा चक्काजाम

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या ३ कृषी कायद्यांविरोधात देशात गेल्या २ महिन्यांहूनही अधिक काळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, एकीकडे संसदेत हा मुद्दा गाजत असतानाच आज (६ फेब्रुवारी) शेतकऱ्यांनी देशभर ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वळगून देशभर आज शेतकऱ्यांचा चक्काजाम सुरू आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. कृषी संयुक्त किसान मोर्चाने याबद्दल माहिती दिली होती.

शेतकऱ्यांचे हे देशव्यापी आंदोलन राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांवर केले जाणार असून ३ तासांच्या या चक्काजामध्ये कोणत्या वाहनांना जाण्यास मूभा दिली जाईल, याबद्दलही कृषी संयुक्त किसान मोर्चाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी देखील या शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनला पाठिंबा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या या चक्काजाम आंदोलनाच्या काळात शाळेच्या बस, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना वगळण्यात आलेले आहे. किसान मोर्चाने ही माहिती दिली आहे. ‘चक्काजाम’च्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नालासोपारा येथे जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

News Desk

कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्माईंची निवड!

News Desk

देश भाजप नाही आरएसएस चालवत आहे | सावित्रीबाई फुले

News Desk