HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जदाता झाला पाहिजे! – नितीन गडकरी

मुंबई | आपल्या देशातला शेतकरी पेट्रोल-डिझेलचा, ऊर्जेचा पर्याय देण्यास सक्षम असून शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. गडकरी यांच्या हस्ते आज सांगली आणि सोलापूर शहरांना रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या बोरगाव – वाटंबरे राष्ट्रीय महामार्ग १६६  आणि सानंद जत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६५ या दोन महामार्गांचे आज (२६ मार्च) लोकार्पण करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.

येणाऱ्या काळात साखरेऐवजी इथेनॉल आणि बगासपासून बिटूमीन बनवायला प्राधान्य द्यायला हवे,असे सांगत गडकरी पुढे म्हणाले की,बिट्यूमिनचे रस्ते आता आम्ही तयार करत असून पुण्याच्या प्राज इंडस्ट्रीने उसाच्या चिपाडापासून आणि बायोमासपासून बायो -बिट्यूमिन तयार केलं आहे. येणारा काळ बिट्यूमिनचा असून राष्ट्रीय महामार्गांच्या बांधणीत ते अनिवार्य करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातल्या सर्व वस्तू थेट निर्यात करता याव्यात यासाठी सांगली जिल्हावासीयांची मागणी असेले ड्राय पोर्ट उभारण्याबरोबर सॅटेलाईट पोर्ट तसेच लॉजिस्टिक पार्क बांधण्याची केंद्र सरकारची तयारी असल्याचे गडकरी यांनी सांगितले. सध्या केंद्र सरकार देशभरात जवळपास २ लाख कोटी रुपयांचे लॉजिस्टिक पार्क आणि सॅटेलाईट पोर्ट बांधत आहे. जालना,  नाशिक यांचा त्यात समावेश असून वर्ध्यातील प्रकल्प पूर्ण झाला आहे. सांगलीतला प्रस्तावही तेव्हा तयार करण्यात आला होता. सांगली जिल्ह्यात रांजणी इथे जवळपास दोन हजार एकर जागा उपलब्ध आहे. केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारे यासाठी सामंजस्य करार करू, असे गडकरी यांनी यावेळी सुचवले.

या लॉजिस्टिक पार्कमध्ये कुठलेही मोठे विमान उतरू शकेल असा साडे तीन किलोमीटरचा रस्ता बांधण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. या प्रस्तावित प्रकल्पामुळे विमानतळ, लॉजिस्टिक पार्क, प्री कुलिंग प्लांट, शीतगृह आणि थेट आयात-निर्यातीची व्यवस्था सांगलीच्या अर्थव्यवस्थेला फायद्याची होईल, असा प्रस्ताव गडकरी यांनी यावेळी राज्य सरकारच्या उपस्थित मंत्र्यांपुढे मांडला. राज्य सरकारने केवळ जागा उपलब्ध करून द्यावी, निधी उपलब्ध करून देण्याची केंद्र सरकारची तयार आहे, असे ते म्हणाले. येणाऱ्या काळात Public Transportation on Electricity ही संकल्पना राबवून १२ हजार कोटी रुपये खर्चाचा पुणे -वाघोली – शिरूर या एकाच मार्गावर,खाली ८ पदरी रस्ता ,वर ६ मार्गीकेचे दोन पूल आणि त्यावर विजेवर आधारित सार्वजनिक वाहतूक सेवा असा प्रकल्प राबविणार अशी माहिती गडकरी यांनी दिली

यावेळी गडकरी यांनी पुणे ते बंगळूरू दरम्यान बांधल्या जात असलेल्या नव्या राष्ट्रीय महामार्गाविषयी सांगितले. ६९९ किलोमीटर लांबीचा हा संपूर्ण हरित महामार्ग असून तो सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मागास भागातून जाणार आहे ज्याचा त्या भागाच्या विकासासाठी फायदा होईल, असे ते म्हणाले. बोरगाव – वाटंबरे या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे तर सांगोला – सानंद- जत या मार्गाचे पुनर्वसन उन्नतीकरण करण्यात आले आहे. ९९.७६ किलोमीटर एकूण लांबी असलेल्या या महामार्ग प्रकल्पांसाठी २,३३४ कोटी रुपये खर्च आला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक या आंतरराज्य वाहतूकीसाठी सुलभ आणि सांगली आणि सोलापूरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या जोडणीशी संबंधित चौपदरीकरण/सहापदरीकरणाची विविध कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर सोपवली आहेत. अर्थसंकल्पीय तरतुदीच्या माध्यमातून सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे राष्ट्रीय महामार्ग अद्ययावत करण्याचे काम एनएचएआयकडून हाती घेण्यात आले. भारतमाला प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग १६६ च्या सांगली ते सोलापूरमधील भागाचे काम एनएचएआयद्वारे एचएएम पद्धतीने हाती घेण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भंडारा जळीतकांड प्रकरण : नर्सचा बेजबाबदारपणा उघड, दोषींवर कारवाई होणार – राजेश टोपे

News Desk

“लाथो के भूत बातों से नही मानते”, आता तर रस्त्यावर संघर्ष करावाच लागणार, मनसेची सरकार विरोधात आक्रमक भुमिका 

News Desk

गोंदिया जिल्ह्यात महिलेवरील घृणास्पद अत्याचाराची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

Manasi Devkar