HW News Marathi
महाराष्ट्र

अमरावतीत शेतक-याची आत्महत्या

अमरावती: जिल्ह्यात शेतीतज्ज्ञ म्हणून प्रख्यात असलेले माजी सरपंच व बाजार समितीचे संचालक अरुण महल्ले (६२) यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन सोमवारी सायंकाळी आत्महत्या केली. त्यांच्यावर तीन लाखांचे कर्ज होते. अरुण महल्ले यांनी १५ एकर शेतावर तीन लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जमाफीचा आॅनलाईन अर्जही त्यांनी भरला होता. यंदा कमी पाऊस व उत्पादन कमी होणार यांची त्यांना जाणीव झाली होती. यामुळे आपण जीवन संपवू शकतो, असे त्यांनी पत्नी चंदा यांना मृत्यूपूर्व सांगितले होते.

सोमवारी सायंकाळी धामणगाव रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेला अमरावती- जबलपूर रेल्वेगाडी येत असताना त्यासमोर उडी घेऊन आत्महत्या केली. एका विचारवंत शेतक-याने आत्महत्येसारखे पाऊल उचलल्यामुळे धामणगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. कजार्मुळेच त्यांनी हे पाऊल उचलले असे त्यांचे पुतणे सचिन महल्ले यांनी सांगितले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परळी तहसीलच्या प्रांगणात बसलेल्या बार्टीच्या विद्यार्थ्यांची सहावी राञही अडक्याच्या थंडीत!

Aprna

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ गणपतीला तब्बल 61 किलोंचा मोदक…..!

News Desk

आरेतील वृक्षतोडीविरोधात सुमोटो याचिका, सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

News Desk