HW News Marathi
महाराष्ट्र

मराठीला ‘अभिजात’ दर्जाच्या मागणीसाठी ४ हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडे रवाना

मुंबई। मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी असलेली ४ हजार पोस्ट कार्ड काल (२० फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडे रवाना करण्यात आली.

याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक जन अभियान सुरू करण्यात आले आहे. हा ‘अभिजात’ दर्जा २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी भाषा दिवस आहे त्याआधी मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सुमारे ४ हजार पोस्ट कार्ड महामहीम राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना पाठविण्यात आली.

हा पोस्ट कार्डचा दुसरा संच आहे, याआधीसुद्धा एक संच राष्ट्रपती महोदयांना पाठविण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस ३० जानेवारीला नागपूर पोलीस आयुक्तांना ‘जनरल डायर’  पुरस्कार देणार!

News Desk

राज्यातील ३४ किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांकरिता जन-सुविधा केंद्राची उभारणी करणार! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

ST कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी अनिल परबांचे आवाहन

News Desk