HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर भुजबळांना जामीन मंजूर

मुंबई: महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अखेर शुक्रवारी जामीन मंजूर झालाआहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनगैरव्यवहार प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ अटक करण्यात आलीहोती.सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम नुकतेच रद्द केले आहे.त्याचा फायदा घेत आपली जामीनावर मुक्तता करावी, अशी भुजबळ यांनी मागणी केली होती.

बुधवारी न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. तेव्हा दोन वर्षांहून अधिक काळापासून आपण तुरुंगात आहोत, आपले वयआता 71 वर्षे झाले आहे, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आपली जामीनावर सुटका करावी, अशी विनंती त्यांनी हायकोर्टात केली होती. मुंबई उच्च न्यायालयानेशुक्रवारी त्यांना जामीन मंजूर केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक सुरू, सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा होणार

News Desk

शेतीच्या पाण्याचे दर वाढवल्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न –अजित पवार

swarit

सांगलीत निवडणूकीची रणधुमाळी होणार सुरू भाजपला सत्ता टिकवण्यासाठी करावी लागणार धावाधाव

News Desk