HW News Marathi
महाराष्ट्र

‘ईडी’चा यू टर्न, शरद पवारांनी तूर्तास चौकशीला येण्याची गरज नाही

मुंबई | महाराष्ट्र सहकारी बँकेच्या घोटळ्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आज (२७ सप्टेंबर) दुपार २ वाजता बॅलार्ड पियर येथील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात स्वतःहून पाहुणचार घेण्यासाठी जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले आहे. मुंबईतील ईडीच्या कार्यलयाबाहेर जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

पवार यांनी पाठवलेल्या ई-मेलला ईडीने रिप्लाय दिला असून, “तूर्तास चौकशीची गरज नाही आणि भविष्यातही चौकशीची गरज पडणार नाही,” असे या मेमध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. पवारांच्या ईडीच्या कारवाईने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवी संजवनी मिळाली असल्याचे आज स्पष्ट चित्र दिसून आले आहे.

पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी पुन्हा एकदा पवारांची भेट घेतली असून पवारांना ईडी पाठवलेल्या मेलनंतर कार्यालयात न जाण्याची विनंती केली. मात्र, पवार पोलीस आयुक्त यांच्या विनंती नंतर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर कायदा मांडणार

swarit

पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाने काँग्रेसच्याच आरोपांना पुष्टी! 

News Desk

‘मूड ऑफ दी नेशन’च्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टॉप फाईव्हमध्ये स्थान पटकावले !

News Desk