HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या सभेसाठी पुण्यात मिळाले मैदान

पुणे | विधानसभा निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर सर्वजण प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी (९ ऑक्टोबर ) सायंकाळी सहा वाजता बाजीराव रस्त्यावरील नातूबागेच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरेंची ही पहिली प्रचार सभा पुण्यातून होणार आहे.

राज ठाकरे यांची पुण्यात सभा घेण्यासाठी मनसेचा प्रयत्न सुरु आहे. यासाठीच मनसेने जिल्हा प्रशासन, पोलिस आयुक्तांकडे टिळक चौक, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, स. प. महाविद्यालय आदी ठिकाणी परवानगी मागितली होती. परंतु, ती अद्याप मिळालेली नाही. याच पार्श्‍वभूमीवर मनसेचे उपनेते बाबू वागस्कर यांनी नातूबागेच्या मैदानावर सभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती दिली आहे.

पुणे शहरातील शैक्षणिक संस्थांवर सध्या सत्ताधारी पक्ष आणि त्याच्याशी संबंधित संघटनांचे वर्चस्व असल्याने इतर राजकीय पक्षांना मैदानेच मिळत नसल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष आणि कसबा पेठेतले उमेदवार अजय शिंदे यांनी केला होता. तसेच मनसेला सभा घेण्यासाठी टिळक चौकाची जागा देण्यात यावी अशी विनंती मनसेने पोलीस आयुक्तांकडे केली होती

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रज्ञाच्या शापाने मरण पावलो ही अंधश्रद्धा, मी देशासाठी शहीद झालो !

News Desk

बाबरी मशीद खटल्याचा निकाल धक्कादायक असून वस्तुस्थितीला धरून नाहीः हुसेन दलवाई

News Desk

“फडणवीसांच्या काळातील जीआरप्रमाणेच दुर्घटना ग्रस्तांना होणार मदत”, विजय वडेट्टीवार…!

News Desk