HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेब थोरात वर्षभराचं मानधन राज्यासाठी देणार, कोरोना लसीकरणासाठी कॉंग्रेसची मदत

मुंबई | राज्यात कोरोनाचं संकट गडद होत असताना मंत्रीच राज्य सरकारच्या मदतीला आले आहेत. महाविकासआघाडी सरकारमधील एक पक्ष म्हणजे कॉंग्रेसने राज्य सरकारला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आपलं वर्षभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याची घोषणा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज (२९ एप्रिल) केली आहे. त्याचबरोबर मोफत लसीकरणाबाबत महाविकास आघाडीचं एकमत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लसीकरणाबद्दल बोलताना ते म्हणाले, आम्ही लसीकरणाबाबत आग्रही आहोत. मात्र लसीकरणासाठी येणारा खर्च मोठा आहे. म्हणूनच माझं वर्षभराचं मानधन राज्यासाठी देणार आहे. यासोबतच कॉंग्रेसचे ५३ आमदार आपलं महिन्याभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच, महाराष्ट्र कॉंग्रेस मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ लाख रुपये देणार असल्याचंही थोरात यांनी सांगितलं आहे. मुख्य म्हणजे मोफत लसीकरणाबाबत महाविकास आघाडीचं एकमत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचसोबत मोफत लसीकरणासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे दोघेही आग्रही असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. मात्र राज्यात मात्र लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यानं १ मेपासून राज्यात लसीकरण सुरु होणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं. राज्यात १८ ते ४४ या वयोगटातील ५ कोटी ७१ लाख लोकसंख्या असून, या सर्वांचे मोफत लसीकरण करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली.

या वयोगटासाठी १ मेपासून लसीकरण करण्याची तयारी राज्याने केली होती. मात्र, राज्याकडे लशींचा पुरेसा साठा नसल्याने या वयोगटाचे लसीकरण लांबणीवर टाकण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मोफत लस सरकारी रुग्णालये किंवा आरोग्य केंद्रांवरच उपलब्ध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाणी तापवण्याच्या किरकोळ कारणावरुन सासऱ्याने सुनेचे हात तोडले

News Desk

‘त्या’ ८० हजार फेक अकाऊंटचे मालक कोण? फेसबुक आणि ट्वीटरने जाहीर करावे !

News Desk

कोरोना काळातील सर्व निर्बंध हटवले, आरोग्यमंत्र्यांची माहिती

Aprna