HW News Marathi
महाराष्ट्र

शैक्षणिक संस्थेत आर्थिक गैरव्यवहार

नाशिक | मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी यामध्ये गोरगरीब विद्यार्थयाच्या फी आकारणी संदर्भात सुमारे आठ कोटीच्या घोटाळा झाल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती बाळासाहेब जांभूळकर यांनी २०११मध्ये माहितीच्या अधिकारा अंतर्गत मिळवली होती. माहितीवरुन जांभूळकर यांनी या संस्थेवर शिक्षण शुल्क समीतीकडे रितसर तक्रार देखील केली होती.

त्यावेळी छगन भुजबळ हे महाराष्ट्र राज्याचे मंत्री असल्यामुळे ही चौकशी रोखण्यात आली. त्यानंतर जांभूळकर यांनी कोर्टाच्या दिशेने धाव घेतली. ही तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव देण्याचा प्रयत्न केला होता. पण, या दबावाला न घाबरता त्यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. हायकोर्टाने एप्रिल २०१४मध्ये या तक्रारीवर कागदपत्रे व पुरावे तपासून चौकशी करण्याचे आदेश शिक्षण शुल्क समितीला दिले होते. यासाठी विशेष समितीची स्थापना करुन दोन महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने भुजबळांच्या बाजूने निर्णय देत ‘मुंबई एजूकेशनल ट्रस्टचे आर्थिक व्यवहार तपासणीचे आदेश रद्दबातल केले.’ न्यायालयाने बाळासाहेब जांभूळकर यांना पन्नास हजार रुपये असा दंहही ठोठावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपुरातही १ कोरोना रुग्ण पॉझिटीव्ह

swarit

दिव्यांगांकडून नाकर्त्या शिवसेना-भाजप सरकारला बांगड्यांचा आहेर – दिव्यांग सेना

News Desk

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण आंदोलन तुर्तास मागे

Aprna