HW News Marathi
Covid-19

आर्थिक पॅकेजचे आत्तपर्यंतचे गणित !

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ढासळलेल्या देशाच्या आर्थिक परिस्थीतीला सावरण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक पॅकेजची घोषणा केली. आत्तापर्यंत जाहीर केलेल्या पॅकेजचे गणित जाणून घेऊयात.

६ फेब्रुवारी –

रिझर्व्ह बँकेने बाजारात रोख प्रवाह वाढवण्याची घोषणा केली होती. त्याअंतर्गत २.8 लाख कोटी रुपयांच्या रोख प्रवाहाचा मार्ग मोकळा झाला होता. कोरोना विषाणूची समस्या भारतात फैलावण्यापुर्वीच रिजर्व्ह बॅंकने ही घोषणा केली होती.

रिझर्व्ह बॅंकेने पुन्हा एकदा रोख रकमेची पावले उचलली. यासाठी आरबीआयने रोख राखीव प्रमाण म्हणजेच सीआरआरला १०० बेस पॉईंटने कपात केली. यामुळे १.३७ लाख कोटी रुपयांच्या रोख प्रवाहाचा मार्ग मोकळा झाला.

त्याचप्रमाणे मार्जिनल स्थायी सुविधा (एमएसएफ) २ वरून २ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली. यामुळे बँकांना १.३७ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोख रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामूळे मार्जिनल स्थायी सुविधा अंतर्गत बँका आपत्कालीन परिस्थितीत पैसे जोडू शकतात.

टारगेटेड लाँग टर्म रेपो ऑपरेशन (टीएलटीआरओ) च्या माध्यमातून बँकिंग प्रणालीमध्ये एक लाख कोटी रुपये ठेवण्याचे आवाहन केले. टीबीटीआरओमार्फत बँक आरबीआयकडून दीर्घ काळासाठी कर्ज घेऊ शकतात. यामुळे बाजारातील रोख प्रवाह कमी होत नाही. अशा प्रकारे बाजारात ३.७४ लाख कोटी रुपयांचा मार्ग मोकळा झाला.

केंद्र सरकारने गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७ लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. त्याला गरीब कल्याण योजना पॅकेज असे नाव देण्यात आले. या अंतर्गत गरीब, मजूर आणि शेतकर्‍यांच्या खात्यावर थेट पैसे पाठवणे. उज्ज्वला योजनेंतर्गत तीन महिन्यांसाठी मोफत सिलिंडर देण्यासारख्या सवलतींचा समावेश केला गेला.

१७ एप्रिल –

त्यानंतर रिझर्व्ह बँकेने अनेक घोषणा केल्या. ५०,००० कोटी रुपयांचा टीएलटीआरओ लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी जाहीर करण्यात आला. तसेच नाबार्ड, एसआयडीबीआय, एनएचबी यांना ५०,००० कोटींची अतिरिक्त पुनर्वित्त सुविधा देण्यात आली. अशा प्रकारे ही घोषणा १ लाख कोटी रुपये होती.

२७ एप्रिल-

रिझर्व्ह बँकेने म्युच्युअल फंड वाचवण्यासाठी दिलासा दिला. त्याअंतर्गत 50 हजार कोटी रुपयांची खास रोख सुविधा जाहीर करण्यात आली.

या सर्वांचा समावेश करून आज सरकारने २ लाख ५ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. तथापि, यापैकी बर्‍याच योजना यापूर्वीच सुरू आहेत, ज्यांचे पैसे यापूर्वीच वाटप केले जातील. परंतु तरीही आम्ही बरेच जड गणित लावतो. परवा केलेली घोषणा सुमारे ५ लाख २० हजार कोटी होती. कालच्या घोषणांची संख्या सुमारे २ लाख ५ हजार कोटी इतकी आहे. एकूण ७ लाख २५ हजार कोटी होते. ह सर्व जोडून १५ लाख २५ हजार कोटी झाले. ४ लाख ७५ हजार कोटी शिल्लक आहेत. प्रथम हे पॅकेज १ लाख ७० हजार कोटींवर आणले. आता ३ लाख ५ हजार कोटी शिल्लक आहेत. आपण पुर्णपणे ३ लाख कोटी समजू. म्हणजेच २०लाख कोटी पैकी १७ लाख कोटी तुम्हाला देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण नको, पवारांचा राहुल गांधींना सल्ला

News Desk

आमदार सुनिल शेळकेंची चिठ्ठी असेल तरच मिळणार लस ! मावळमध्ये अजब प्रकार  

News Desk

दिलासादायक! महाराष्ट्रात नवा कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण नाही – राजेश टोपे

News Desk