HW News Marathi
महाराष्ट्र

“नाम” संस्थेमार्फत आत्महत्या ग्रस्त शेतकरी परिवाराला आर्थिक मदत

अमरावती | नाम फाउंडेशनच्या माध्यमातुन अमरावती जिल्ह्यातील अत्यंत गरजु आत्महत्या ग्रस्त शेतकरी परीवाराला सतत मदतीचा हात देण्यात येत आहे.

त्याच अनुशंगाने नाम संस्थेचे अमरावती जिल्हा समन्वयक वासुदेव जोशी व शेतकरी नेते प्रकाश साबळे यांच्या पुढाकाराने अमरावती जिल्ह्यातील २ परिवार व दर्यापुर तालुक्यातील १ परीवार यांना प्रत्येकी १५०००/- रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली.

याप्रसंगी अमरावती प. स. सदस्य गणेशराव कडु, किसनराव चव्हान, अमोलजी कुंभार (तहसीलदार), श्रिकांत डालके, महेश पेढेकर, विष्णु मंदुरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी नया अकोला येथिल मृतक तरुण शेतकरी नंदु चव्हान यांची पत्नी सौ रेखा चव्हान तसेच पुसदा येथिल मृतक शेतकरी सुरेश मंदुरकर यांची पत्नी दुर्गा मंदुरकर व उमरी बाजार येथिल मृतक शेतकरी रविकांत माहुलकर यांची पत्नी सुषमा माहुलकर यांना “नाम फाउंडेशनच्या” वतीने प्रत्येकी १५०००/- चा धनादेश वासुदेव जोशी व युवानेते प्रकाश साबळे यांच्या व गणेश कडु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“घाव वर्मी बसला”, सामना अग्रलेखावरुन फडणवीसांचा पलटवार  

News Desk

“गतिमानपणे मुंबईचा कायापालट”, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

Aprna

झोटिंग समितीच्या गहाळ अहवालावरून उपमुख्यमंत्र्यांचा सवाल

News Desk
मुंबई

नो पार्किंग गाड्यांवर कारवाई करण्यासाठी ‘बाईक पे चर्चा’

News Desk

मुंबई | घाटकोपर पूर्व येथे कामराज नगर विविध जाती धर्माची कष्टकरी जनता मोठ्या संख्येने या परिसरात राहते.या वसाहती मध्ये दळणवळणासाठी फक्त १२ फुटाचा रस्ता असून त्या रस्त्यावर अनेक ठिकाणी तेथे राहणाऱ्या नागरिकांच्या बाईक व अनेक प्रकारची वाहने उभी केल्यामुळे लोकांना चालण्यासाठी फक्त ८ ते ९ फुट रस्ता शिल्लक राहत आहे.

या वसाहतीला दुसरा कोणताही रस्ता नसल्यामुळे सकाळी व संध्याकाळी या रस्त्यावर लोकांनची कामावर जाण्यासाठी व घरी येण्यासाठी मोठी गर्दी होते. त्यातच जर या रस्त्यावर एखादी चार चाकी वाहन आले तर खूपच गर्दी होत होती. कारण बाईकमुळे अर्ध्या रस्ता बंद होत असून त्यात अशा गाड्या कामराज नगर मध्ये आल्या की लोकांना जाणे येणे मुश्किल होते. तेव्हा नुकतीच मुंबईमध्ये एलफिन्स्टन रेल्वे ब्रीजवर घडलेल्या चेंगराचेंरीची आठवण येते .

या रस्त्यावर तीन मोठ्या शाळा असून एक महानगर पालिकेची तर दोन खाजगी जेव्हा या शाळा भरतात व सुटतात. या रस्त्यावर पार्किंगमुळे रस्ता जाम होतो. तेव्हा तर शाळेतील मुले व पालकांच्या डोळ्यांत पाणी येते. शाळेत नाही गेल तर पालक ओरडतात व शाळेला उशीर झाल्या तर शिक्षक पण ओरडतात. अशा सगळ्या प्रकाराला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत असे.

या सर्व बाबींचा विचार करुन या वसाहती मधील काही तरुणानी पार्किंग या गंभीर विषयाचा विचार करत. रविवारी दिनाक ‘बाईक पे चर्चा’ या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. लोकांना व वाहन धारकांना या गंभीर विषया बाबतीत माहीत देऊन भविष्यात होणार दुर्रघटनेची माहीती दिली. व आपली वाहने येथे न लावता बाहेर लावण्याचे आव्हान केले, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून लोक स्वतः हून आपल्या गाड्या बाहेर लावत आहेत चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

अनेक स्थानिक नागरिकांनी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी तक्रारी केल्या असून म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. तरीही अजून काही गाड्या तेथेच ऊभ्या आहेत. त्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी नाही केली तर, आम्ही येथे रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करू असा इशारा समाजसेवक संतोष पिंगळे यांनी दिला आहे.

 

Related posts

खडसेंना फसविण्याचा दमानियांचा कट

Adil

४० हजार अन्नदात्याचा आपल्या हक्कासाठीचा खडतर प्रवास थेट सरकारकडे, त्यापैकी ९० टक्के मागण्यांवर निवारण

News Desk

कोरोनासारखाचं आणखी १ विषाणू समाजात आलाय, मुख्यमंत्री कोणत्या विषाणूबद्दल बोलले ?

News Desk