HW News Marathi
मुंबई

खडसेंना फसविण्याचा दमानियांचा कट

मुंबई | भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्या प्रकरणी मंत्रीपदापासून पाय उतार झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना या प्रकरणात गोवण्याचा पूर्व नियोजित कट होता असा आरोप अण्णा हजारे यांच्या आंदोलनातील कोअर कमिटीच्या सदस्या कल्पना इनामदार यांनी केला . ११ एप्रिल रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना इनामदार म्हणाल्या, अंजली दमानिया यांचे पती अनिस यांनी मेव्हणे आणि दमानिया यांचे भाऊ मालप यांना सांगून मला त्यांच्या घरी बोलावले होते. त्यावेळी अजित पवार यांच्याबाबत देखील चर्चा झाली. ही चर्चा झाल्यानंतर आपल्याला खडसेंना अडकवायचे आहे. त्यासाठी मी तुम्हाला पैसे देते असे मला अंजली दमानिया यांनी सांगितले. काही पत्र मी तुम्हाला देते ती घेऊन तुम्ही खडसे यांच्या ऑफिसला जा आणि त्यावेळी मी दिलेले पैसे खडसे यांच्या टेबलवर ठेवा. त्यानंतर मी मागून लगेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला घेऊन येते असे मला सांगितल्याचा आरोप इनामदार यांनी केला. त्यावेळी मी त्यांना म्हटलं मी असे काम करणार नाही. त्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मी आंदोलनाला जोडल्यानंतर काहींनी माझा संबंध संघाशी जोडला. हे जोडणारे काही सुकाणू समितीचे नेते आहेत. त्यामध्ये राजू शेट्टी हे देखील आहेत. तसेच अंजली दमानिया आंदोलनाला आल्या तेव्हा त्यांनी अनेक आरोप केले. तसेच माझी बदनामी केली त्याचा पुरावा दमानिया यांनी द्यावा अन्यथा मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असून अंजली दमानिया यांच्या विरोधात मी कोर्टात जाणार असल्याचे यावेळी कल्पना इनामदार यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करा | शरद पवार

News Desk

कुर्ला-टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे

News Desk

लोकायुक्तांकडे दररोज दाखल होतात 15 तक्रारी

News Desk