मुंबई । कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्षात सुरू करण्यास अडचणी होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत शैक्षणिक दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात डिजिटल आणि दुसऱ्या टप्प्यात फिजिकल असे या शैक्षणिक वर्षाचे स्वरुप असणार आहे.
येत्या १५ जूनपासून ऑनलाईन लर्निंग फॉर्म होम संकल्पना सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईत १५ जूनपासून एकही शाळा प्रत्यक्षात सुरू होणार नसल्याने ऑनलाईन शिकवणीवर भर दिला जाणार आहे. राज्यात कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर शिफ्टमध्ये शाळा सुरू केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवण्यात येईल, असे नियोजनच करून वर्ग भरविण्यात जाणार आहेत. पालिकेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याच्या कामास सुरूवात झाली आहे.
विद्यार्थ्याच्या घरी अँड्रॉईड मोबाईल आहे का ? तो मुंबईबाहेर आहे की मुंबईत किती विद्यार्थी राहतात?, १५ जून तसेच १ जुलैपर्यंत येवू शकणा-या विद्यार्थ्यांची संख्या किती ? अशी माहिती गोळा करण्यात केली जात आहे.केंद्र आणि राज्य सरकार निर्मित दिक्षा या मोबाईल ऍपद्वारे ई-लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.